नवी दिल्ली : भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्रांतीला वेग देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने २०३० पर्यंत तब्बल १७.५ अब्ज डॉलर (१.४५ लाख कोटीपेक्षा अधिक) गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे देशात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर, क्लाउड सुविधा आणि एआय पायाभूत यंत्रणा उभारली जाणार आहे.
ही गुंतवणूक भारताच्या डिजिटल आणि तांत्रिक झेपेचा जागतिक पुरावा असल्याचे नाडेल यांनी म्हटले आहे.
भारतीय तरुणांना आता जगभरात संधी
भारतातील युवकांना जागतिक रोजगार संधींमध्ये प्रवेश मिळावा, त्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कौशल्य वाढावे या उद्देशाने सरकारने माइक्रोसॉफ्टसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. यात, माइक्रोसॉफ्ट जागतिक नेटवर्कद्वारे १५ हजारांहून अधिक नियोक्ता आणि भागीदारांना सरकारच्या एनसीएस या डिजिटल रोजगार मंचाशी जोडणार आहे.
सामाजिक सुरक्षेचे कवच : २०१५ मध्ये १९ टक्के लोकसंख्येला सामाजिक सुरक्षा होती ती २०२५ मध्ये ६४.३ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचली आहे. मार्च २०२६ पर्यंत १०० कोटी नागरिक सामाजिक संरक्षणाखाली आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
