वॉशिंग्टन : वर्ष २०२५ मध्ये स्थिर जागतिक वृद्धीची स्थिती असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेत किंचित घसरण होऊ शकते, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी दिला आहे.
जॉर्जिव्हा यांनी शुक्रवारी पत्रकारांबरोबर वार्षिक गोलमेज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, २०२५ मध्ये जागतिक वृद्धी स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, विभागीय पातळीवर अस्थिरता राहील, असे दिसते. त्यात भारतीय अर्थव्यवस्था काही प्रमाणात कमजोर होऊ शकते. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ अधिक तपशील जॉर्जिव्हा यांनी दिला नाही.