Lokmat Money > बिझनेस न्यूज > १५ वर्ष जुनी, केवळ ७५ बॉटल्स... भारतातील सर्वात महागडी व्हिस्की; एका बॉटलच्या किंमतीत घ्याल कार

१५ वर्ष जुनी, केवळ ७५ बॉटल्स... भारतातील सर्वात महागडी व्हिस्की; एका बॉटलच्या किंमतीत घ्याल कार

या भारतीय कंपनीनं तयार केलेल्या व्हिस्कीची किंमत इतकी आहे की त्यात तुम्ही एक कारही विकत घेऊ शकता. काय आहे यात खास.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:18 IST2025-02-27T09:17:04+5:302025-02-27T09:18:56+5:30

या भारतीय कंपनीनं तयार केलेल्या व्हिस्कीची किंमत इतकी आहे की त्यात तुम्ही एक कारही विकत घेऊ शकता. काय आहे यात खास.

indian brand amrut launches luxury single malt whisky Expedition priced at a whopping rs 10 lakh | १५ वर्ष जुनी, केवळ ७५ बॉटल्स... भारतातील सर्वात महागडी व्हिस्की; एका बॉटलच्या किंमतीत घ्याल कार

१५ वर्ष जुनी, केवळ ७५ बॉटल्स... भारतातील सर्वात महागडी व्हिस्की; एका बॉटलच्या किंमतीत घ्याल कार

Amrut Expedition Whiskey Launched: अमृत डिस्टिलरीजने आपल्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त भारतातील सर्वात जुनी आणि महागडी सिंगल माल्ट व्हिस्की 'अमृत एक्सपिडिशन' लाँच केली आहे. १५ वर्षे जुन्या असलेल्या या व्हिस्कीच्या जगभरात केवळ ७५ बॉटल्स उपलब्ध असून हे एक रेअर कलेक्टर आयटम आहे. याची किंमत १२,००० डॉलर (सुमारे १०.५० लाख रुपये) पेक्षा जास्त आहे, जी भारतीय व्हिस्कीसाठी एक नवं स्टँडर्डही सेट करते. हे निरनिराळ्या प्रकारचं कास्क, शेरी आणि बॉर्बनपासून तयार केले जाते. या व्हिस्कीचं पॅकेजिंगही खूप खास आहे. यात हातानं तयार केलेला डबा, हिऱ्यानं कापलेली बॉटल, सोन्याचे कोरीव काम आणि चांदीचा पेग यांचा समावेश आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, युरोप, दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या प्रमुख बाजारपेठांमध्ये ही व्हिस्की लाँच करण्यात आली आहे.

अमृत एक्सपीडिशनला दोन निरनिराळ्या कास्कमध्ये तयार करण्यात आलंय. पहिले आठ वर्ष ती युरोपातून आणलेल्या एक खास शेरी कास्कमध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर सात वर्ष ती अमेरिकेच्या बॉर्बन कास्कमध्ये ठेवण्यात आली. 

या व्हिस्कीच्या केवळ ७५ बॉटल्स उपलब्ध आहेत. याची किंमत १० हजार डॉलर्सपेक्षा अधिक आहे. ही व्हिस्की भारत, अमेरिका, ब्रिटन, युरोप, दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आली आहे.

पॅकेजिंगही आहे खास

अमृत एक्सपीडिशनचं पॅकेजिंग व्हिस्कीइतकंच खास आहे. प्रत्येक बॉटल हातानं तयार केलेल्या बॉक्समध्ये येते, जी सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि पाच प्रोटोटाइपनंतर तयार करण्यात आली आहे. ही बॉटल हिऱ्याप्रमाणे कापली असून त्यावर सोन्याचे कोरीव काम असल्यानं ती एक अनोखी ठरते. याशिवाय प्रत्येक बॉटलवर हातानं बनवलेला चांदीचा पेगही असतो, जो बंगळुरूच्या एका कुशल कारागिरानं बनवला आहे. प्रत्येक बॉटलमध्ये एनएफसी टॅग आणि एक ऑथेंटिकेशन कार्ड देखील आहे.

Web Title: indian brand amrut launches luxury single malt whisky Expedition priced at a whopping rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.