Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत-अमेरिका व्यापार करार: रशियन तेलाच्या खरेदीवर निर्बंध; बदल्यात निर्यात शुल्कात मोठी कपात? जाणून घ्या

भारत-अमेरिका व्यापार करार: रशियन तेलाच्या खरेदीवर निर्बंध; बदल्यात निर्यात शुल्कात मोठी कपात? जाणून घ्या

India America Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की, या द्विपक्षीय करारामुळे भारतीय वस्तूंच्या आयातीवरील रेसिप्रोकल शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली येईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 08:35 IST2026-02-04T08:35:01+5:302026-02-04T08:35:01+5:30

India America Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की, या द्विपक्षीय करारामुळे भारतीय वस्तूंच्या आयातीवरील रेसिप्रोकल शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली येईल.

India US trade deal Restrictions on Russian oil purchases Big cut in export duties in return Know | भारत-अमेरिका व्यापार करार: रशियन तेलाच्या खरेदीवर निर्बंध; बदल्यात निर्यात शुल्कात मोठी कपात? जाणून घ्या

भारत-अमेरिका व्यापार करार: रशियन तेलाच्या खरेदीवर निर्बंध; बदल्यात निर्यात शुल्कात मोठी कपात? जाणून घ्या

India America Trade Deal: अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारांतर्गत भारत आता रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी मर्यादित करणार आहे. या निर्णयाच्या बदल्यात अमेरिका भारतीय वस्तूंवरील व्यापार शुल्क कमी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नायरा एनर्जीसारख्या रिफायनरी, ज्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्यायी स्रोत नाही, त्या सध्या आयात सुरू ठेवतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की, या द्विपक्षीय करारामुळे भारतीय वस्तूंच्या आयातीवरील रेसिप्रोकल शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली येईल.

रशियन तेल खरेदी बंद केल्यास टॅरिफमध्ये सवलत

राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलं की, भारतानं रशियन तेल खरेदी बंद करणं, अमेरिकेविरुद्धचं टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळे कमी करणं आणि ५०० अब्ज डॉलर्सची अतिरिक्त अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनं खरेदी करण्याची कटिबद्धता दर्शवल्यामुळे ही सवलत दिली आहे. रशियन तेल खरेदी बंद करण्याच्या निर्णयामुळे आधी लादलेलं अतिरिक्त २५ टक्के शुल्क हटवलं जाईल, ज्यामुळे भारतीय निर्यातीवरील प्रभावी अमेरिकन टॅरिफ दर ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांवर येईल.

जुने करार पूर्ण होणार, पण नवीन ऑर्डर नाही

रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी मॉस्कोवर निर्बंध लादले होते, परंतु सवलतीच्या दरामुळे भारतीय रिफायनरीज रशियन तेलाच्या मोठ्या ग्राहक बनल्या होत्या. ताज्या घडामोडींनुसार, भारतीय रिफायनरीज जुन्या करारांनुसार व्यवहार पूर्ण करतील, परंतु आता नवीन ऑर्डर देणार नाहीत. भारतीय निर्यातदारांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे.

भारतीय कंपन्यांची रशियन तेलाबाबत भूमिका

हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), मॅंगलोर रिफायनरी (MRPL) आणि एचपीसीएल-मित्तल एनर्जी (HMEL) यांसारख्या रिफायनरींनी गेल्या वर्षीच रशियाकडून तेल खरेदी बंद केली होती. इंडियन ऑईल (IOCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या कंपन्या देखील आपली खरेदी हळूहळू कमी करतील. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षाच्या अखेरीस रशियन तेल कंपन्यांवरील अमेरिकन निर्बंधांनंतर खरेदी थांबवली होती.

नायरा एनर्जीसाठी विशेष सवलत शक्य

या नियमाला 'नायरा एनर्जी' ही एकमेव अपवाद असू शकते. रशियाशी असलेल्या संबंधांमुळे नायरा आधीच युरोपियन युनियन आणि ब्रिटनच्या निर्बंधांना सामोरं जात आहे. यामुळे इतर कोणतेही पुरवठादार कंपनीशी व्यवहार करण्यास तयार नाहीत. परिणामी, कंपनीला रशियन तेल खरेदी करणे भाग पडत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत रिफायनरीच्या या अनोख्या स्थितीबद्दल माहिती देण्यात आली असून, नायराला या धोरणातून सूट दिली जाऊ शकते किंवा त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाऊ शकते.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की, भारतावर लागू असलेलं २५ टक्के शुल्क आता तत्काळ प्रभावानं १८ टक्के असेल. हे शुल्क सिंगापूर वगळता इतर आसियान अर्थव्यवस्था (१९%) आणि बांगलादेश (२०%) यांच्यापेक्षा कमी आहे. रशियन तेलाशी संबंधित अतिरिक्त २५ टक्के शुल्क देखील हटवलं जाईल, कारण भारताने रशियन तेल खरेदी बंद करण्यास संमती दर्शवली आहे.

Web Title : भारत-अमेरिका व्यापार समझौता: रूसी तेल पर अंकुश, निर्यात शुल्क में कटौती?

Web Summary : अमेरिका के साथ व्यापार समझौते के तहत, भारत रूसी तेल के आयात को सीमित करेगा जिसके बदले में शुल्क में कटौती होगी। जिन रिफाइनरियों के पास कोई विकल्प नहीं है, वे आयात जारी रख सकती हैं। भारतीय वस्तुओं पर पारस्परिक शुल्क 25% से घटकर 18% हो जाएगा, जो रूसी तेल पर अंकुश लगाने और अधिक अमेरिकी सामान खरीदने पर निर्भर है। कुछ रिफाइनरियों को छूट मिल सकती है।

Web Title : India-US Trade Deal: Curbs on Russian Oil, Export Duty Cut?

Web Summary : Under a US trade deal, India will limit Russian oil imports for tariff cuts. Refineries with no alternatives may continue imports. Reciprocal fees on Indian goods will drop from 25% to 18%, conditional on curbing Russian oil and buying more US goods. Some refineries may be exempt.