Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोक-या देण्यात भारत जगात दुस-या स्थानी

नोक-या देण्यात भारत जगात दुस-या स्थानी

कंपन्यांमधील नियुक्त्यांच्या संदर्भात भारताचे जगात दुसरे स्थान कायम आहे. परंतु नियुक्त्यांची गती येत्या तीन महिन्यांत मंद राहील, असे वैश्विक स्टाफिंग कंपनी मॅन पॉवरने म्हटले.

By admin | Updated: June 9, 2015 23:37 IST2015-06-09T23:37:48+5:302015-06-09T23:37:48+5:30

कंपन्यांमधील नियुक्त्यांच्या संदर्भात भारताचे जगात दुसरे स्थान कायम आहे. परंतु नियुक्त्यांची गती येत्या तीन महिन्यांत मंद राहील, असे वैश्विक स्टाफिंग कंपनी मॅन पॉवरने म्हटले.

India ranked second in the world | नोक-या देण्यात भारत जगात दुस-या स्थानी

नोक-या देण्यात भारत जगात दुस-या स्थानी

नवी दिल्ली : कंपन्यांमधील नियुक्त्यांच्या संदर्भात भारताचे जगात दुसरे स्थान कायम आहे. परंतु नियुक्त्यांची गती येत्या तीन महिन्यांत मंद राहील, असे वैश्विक स्टाफिंग कंपनी मॅन पॉवरने म्हटले.
मॅन पॉवर जगातील आर्थिक हालचालींचा आढावा घेणारे तिमाही एक सर्वेक्षण जारी करते. ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल कंपनीने जारी केला आहे. त्यानुसार, नोकऱ्या देण्याच्या बाबतीत तैवान प्रथम क्रमांकावर आहे.
सर्वेक्षणानुसार भारतात नव्या कंपन्यांमध्ये आणि येत्या सप्टेंबरमधील तिमाहीमध्ये निमग्रामीण क्षेत्रात मागणी जास्त असेल. मॅन पॉवरने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीनुसार देशभरातील ५००७ कंपन्यांपैकी ३७ टक्के नियुक्ती योजनांबद्दल आशावादी आहेत आणि रोजगाराच्या शोधात असलेल्यांना रोजगाराच्या निर्मितीमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

> सर्वेक्षणानुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीत एकूण नियुक्त्यांची परिस्थिती गेल्या तीन महिन्यांच्या व गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नियुक्त्यांच्या तुलनेत धीमी असेल.

Web Title: India ranked second in the world