Jobs in New Zealand : १० वर्षांपासून रेंगाळलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अखेर नऊ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाल्या. या ऐतिहासिक करारामुळे भारतीय कामगारांसाठी न्यूझीलंडची दारे उघडली असून, भारताच्या उत्पादन व पायाभूत सुविधा क्षेत्रात न्यूझीलंडकडून तब्बल २० अब्ज डॉलरची गुंतवणूक येणार आहे.
काय मिळणार अन् काय वाचणार? : सध्या भारताच्या उत्पादनांवर न्यूझीलंडमध्ये २.३% आयात शुल्क लागते, तर न्यूझीलंडच्या उत्पादनांवर भारतात १७.८% शुल्क लागते. करारामुळे कोणतेही शुल्क लागणार नाही.
भारत-न्यूझीलंडमधील सध्याचा व्यापार
| वर्ष | आयात (अब्ज डॉलर) | निर्यात (अब्ज डॉलर) | व्यापार (अब्ज डॉलर) |
| २०२४ | ०.९७ | १.१० | २.०७ |
| २०२३ | ०.८४ | ०.९१ | १.७५ |
| २०२२ | ०.५४ | ०.९६ | १.५० |
| २०२१ | ०.७५ | ०.८० | १.५५ |
| २०२० | ०.९३ | ०.७४ | १.६७ |
गुंतवणुकीचा महापूर : न्यूझीलंड १५ वर्षांत २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यामुळे रोजगार वाढतील.
व्हिसा, नोकरीच्या संधी
५,००० व्हिसा कोटा
दरवर्षी ५,००० भारतीय कुशल कामगारांना न्यूझीलंडमध्ये ३ वर्षांपर्यंत काम करण्याची परवानगी मिळेल.
कोणाला संधी?
आयटी तज्ज्ञ, इंजिनिअर्स, डॉक्टर, नर्स, शिक्षक यांच्यासह योग शिक्षक, भारतीय शेफ, आयुषतज्ज्ञांना विशेष प्राधान्य.
वाचा - ८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
विद्यार्थ्यांना काय फायदा
पीएचडी करणाऱ्यांना ४ वर्षे, स्टेम पदवीधरांना ३ वर्षे न्यूझीलंडमध्ये राहून काम करण्याची संधी मिळेल.
