Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंडियामेड कारचा जगात डंका, जपानची निर्यात वर्षात तिप्पट

इंडियामेड कारचा जगात डंका, जपानची निर्यात वर्षात तिप्पट

कमी उत्पादन खर्च, चांगली गुणवत्ता, सरकारच्या प्रोत्साहन धोरणांचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:28 IST2025-05-29T12:28:00+5:302025-05-29T12:28:00+5:30

कमी उत्पादन खर्च, चांगली गुणवत्ता, सरकारच्या प्रोत्साहन धोरणांचा लाभ

India made cars take the world by storm Japan s exports triple in a year honda maruti cars favourite | इंडियामेड कारचा जगात डंका, जपानची निर्यात वर्षात तिप्पट

इंडियामेड कारचा जगात डंका, जपानची निर्यात वर्षात तिप्पट

विकसित देशांमध्येही ‘मेड इन इंडिया’ कारची मागणी वाढली आहे. कारनिर्मितीमध्ये अग्रेसर अससेल्या जपानचाही समावेश आता सर्वाधिक ‘मेड-इन-इंडिया’ कारची निर्यात केल्या जाणाऱ्या पाच देशांमध्ये झाला आहे. यातून देशाच्या ऑटोमोबाइल उत्पादनांची जागतिक पातळीवरील स्वीकारार्हता वाढल्याचं दिसून येत आहे. 

वाणिज्य मंत्रालय आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सनं (सियाम) दिलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये जपान केलेल्या निर्यातीचे मूल्य वाढून ६१६.४५ दशलक्ष डॉलरवर पोहोचले आहे. ही निर्यात मागील वर्षी समान कालावधीत २२०.६२ दशलक्ष डॉलर इतकी होती. एका वर्षात निर्यातीत जवळपास तिप्पट वाढ झाली आहे.

सुझुकी, होंडा कंपनीच्या गाड्यांना पसंती

मारुती सुझुकीने या वर्षी जानेवारीपासून जपानला जिम्नी एसयूव्हीची निर्यात सुरू केली. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी राहुल भारती म्हणाले की, इलेक्ट्रिक ई-व्हिटारा एसयूव्हीची लवकरच युरोप आणि जपानसारख्या विकसित बाजारांमध्ये निर्यात केली जाईल. तसेच, होंडा कार्स इंडियाने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ४५,१६७ एसयूव्ही एलिव्हेटची निर्यात केली. 

प्रवासी वाहनांच्या निर्यात १५ टक्के वाढ

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातून एकूण पॅसेंजर कारची निर्यात १५% वाढून ७.७ लाख युनिट्सवर पोहोचली आहे. देशांतर्गत विक्री फक्त २% दरानं वाढून ४३ लाख युनिट्स इतकी झाली.

ऑटोमोबाइल उद्योगानं ५ वर्षांत एकूण निर्यात ३०% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी झपाट्यानं वाढत आहे. यांचा एकूण निर्यातीमधील हिस्सा २५ टक्केपेक्षा जास्त आहे.

ब्रँडला नवी उंची : भारत झपाट्यानं जागतिक ऑटोमोबाइल उत्पादनाचे केंद्र बनत आहे. कमी खर्च, उच्च गुणवत्ता व निर्यातील प्रोत्साहन धोरणामुळे ‘मेड-इन-इंडिया’ ब्रँडला नव्या उंचीवर नेलंय. 

Web Title: India made cars take the world by storm Japan s exports triple in a year honda maruti cars favourite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.