IND Vs PAK Jio Airtel Vi SONY LIV Offer: ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ च्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवण्यात आला. आता रविवारी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक रोमांचक सामना होणार आहे. १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. हा सामना दुबईमध्ये खेळवला जाणारे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टीव्ही चॅनेलवरही केलं जात आहे. तसंच, या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आहे. तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२५ सामना मोफत पाहू शकता. कसं ते जाणून घेऊया.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर २०२५ रोजी खेळवला जाईल. हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल. त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग Sony LIV वर केलं जाईल. तसंच, हा सामना सोनी स्पोर्ट्स चॅनलवर लाईव्ह दाखवला जाणारे. दरम्यान, मोबाईलवर सामना पाहण्यासाठी, तुम्हाला Sony LIV सबस्क्राइब करावं लागेल. त्याच्या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत दरमहा ३९९ रुपयांपासून सुरू होते.
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
Sony LIVचा एक वर्षाचा मोबाईल सबस्क्रिप्शन प्लान ६९९ रुपयांना येतो. Sony LIV प्रीमियमच्या एका महिन्याच्या प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. Sony LIV प्रीमियम प्लानच्या एका वर्षाच्या प्लॅनची किंमत १४९९ रुपये आहे.
अशा प्रकारे तुम्ही सामना मोफत पाहू शकता
जर तुम्हाला Sony LIVचं प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यायचं नसेल, तर तुम्ही तुमच्या फोनवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मोफत पाहू शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त जिओ, एअरटेल किंवा व्हीआयचे सिम कार्ड असणं आवश्यक आहे. तुमच्या माहितीसाठी, लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये वापरकर्त्यांना Sony LIVचं मोफत सबस्क्रिप्शन देतात.
जिओच्या १७५ रुपयांच्या प्लानमध्ये Sony LIVसह १० ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. यात १० जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. हा एक डेटा पॅक आहे. एअरटेलचा डेटा पॅक १८१ रुपयांना येतो. यामध्ये युजर्सना १५ जीबी डेटा तसंच एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियमचं सबस्क्रिप्शन मिळते. व्हीआयचा ९५ रुपयांचा प्लान आहे. त्यात १४ दिवसांसाठी ४ जीबी डेटा मिळतो. यासोबतच Sony LIVचं सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही प्लान निवडू शकता.