Lokmat Money > बिझनेस न्यूज > UPI युझर्स लक्ष द्या! १ एप्रिलपासून बँक ‘हे’ मोबाइल नंबर हटवणार; काय आहे NPCI चा नियम

UPI युझर्स लक्ष द्या! १ एप्रिलपासून बँक ‘हे’ मोबाइल नंबर हटवणार; काय आहे NPCI चा नियम

UPI News : यूपीआय व्यवहारांचा वापर आता सामान्य झाला आहे. याद्वारे कोणतंही पेमेंट काही सेकंदात पूर्ण केलं जातं. तुम्हीही यूपीआय सेवेचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

By जयदीप दाभोळकर | Updated: March 5, 2025 13:09 IST2025-03-05T13:07:24+5:302025-03-05T13:09:28+5:30

UPI News : यूपीआय व्यवहारांचा वापर आता सामान्य झाला आहे. याद्वारे कोणतंही पेमेंट काही सेकंदात पूर्ण केलं जातं. तुम्हीही यूपीआय सेवेचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

important news for upi users rules will change from 1 april 2025 financial year know about impact | UPI युझर्स लक्ष द्या! १ एप्रिलपासून बँक ‘हे’ मोबाइल नंबर हटवणार; काय आहे NPCI चा नियम

UPI युझर्स लक्ष द्या! १ एप्रिलपासून बँक ‘हे’ मोबाइल नंबर हटवणार; काय आहे NPCI चा नियम

UPI News : यूपीआय व्यवहारांचा वापर आता सामान्य झाला आहे. याद्वारे कोणतंही पेमेंट काही सेकंदात पूर्ण केलं जातं. तुम्हीही यूपीआय सेवेचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवे नियम नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून लागू होतील.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं बँकांना निर्देश दिला आहे. १ एप्रिल २०२५ पासून इतर कोणाला देण्यात आलेले किंवा बंद झालेले मोबाइल नंबर हटवण्यात यावेत, असं सांगण्यात आलंय. याशिवाय यूपीआयद्वारे देवाणघेवाण आणखी अधिक सुरक्षित व्हावे आणि अनधिकृत देवाणघेवाणींना थांबवता येईल, हा यामागचा उद्देश आहे.

सिस्टम अपडेट आवश्यक

चुकीचे यूपीआय व्यवहार रोखण्यासाठी एनपीसीआयनं बँका आणि यूपीआय पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना नियमित अंतरानं आपली प्रणाली अपडेट करण्यास सांगितलं आहे. १६ जुलै २०२४ रोजी झालेल्या एनपीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, जो आता १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल.

बँका आणि यूपीआय पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून होणारे अयशस्वी किंवा चुकीचे व्यवहार रोखण्यासाठी दर आठवड्याला मोबाइल क्रमांकांची अपडेटेड यादी तयार केली जाणार आहे. युझर्सनं मान्यता दिल्यानंतरच मोबाइल नंबर अपडेट केले जातील. यूपीआय अॅपद्वारेच ही संमती देण्याचा पर्याय असेल. जर युझरनं संमती दिली नाही आणि मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर, त्या मोबाइल नंबरद्वारे यूपीआय व्यवहार केले जाणार नाहीत.

नियमांचं पालन करावं लागणार

१ एप्रिल २०२५ पासून बँका आणि यूपीआय अॅप्सना दर महिन्याला एनपीसीआयला अहवाल सादर करावा लागणार आहे. ज्यामध्ये मोबाइल क्रमांकांशी संबंधित यूपीआय आयडीची संख्या, अॅक्टिव्ह युजर्सची संख्या, यूपीआय आधारित व्यवहारांची संख्या याबाबत माहिती द्यावी लागेल.

Web Title: important news for upi users rules will change from 1 april 2025 financial year know about impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा