लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सर्व पॅन कार्डधारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे. निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल आणि त्याचा थेट परिणाम दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार आहे, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिला आहे.
लिंक करण्याची सोपी पद्धत
https://www.incometax.gov.in/iec/foportal या इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या. ‘लिंक आधार’ टॅबवर क्लिक करा. तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाकत व्हॅलिडेट बटण दाबा. मोबाइलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल आणि पॅन-आधार लिंक होईल.
पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल?
- बँक खाते किंवा डिमॅट खाते उघडता येणार नाही.
- ५०,००० पेक्षा जास्त रोख ठेवी करता येणार नाही.
- गुंतवणूक, एसआयपी सुरू करणे, ट्रेडिंग करणे अशक्य.
- सरकारी आर्थिक कल्याण योजनांचा लाभ मिळणार नाही.
- कर्जाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- घर, वाहन खरेदी-विक्री करता येणार नाही.
- बिलिंग किंवा कर भरण्याचे सर्व कामकाज थांबेल.
- परकीय चलन व्यवहार पॅनशिवाय करता येणार नाहीत.
