Warren Buffett News: अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार आणि टॉप श्रीमंतांपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ते बर्कशायरचे वार्षिक पत्र लिहिणं बंद करणार आहेत. बफे गेल्या सहा दशकांपासून हे पत्र लिहीत होते, जे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं होतं. परंतु आपण दरवर्षी थँक्सगिव्हिंगला आपल्या शेअरधारकांना संदेश पाठवत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
१४९ अब्ज डॉलरच्या निव्वळ संपत्तीसह (Net Worth), बफे जगातील श्रीमंतांच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत. "मी यापुढे बर्कशायरचा वार्षिक अहवाल लिहिणार नाही आणि वार्षिक बैठकीत अविरत बोलणारही नाही. इंग्रजी भाषेत सांगायचे झाल्यास, आता मी शांत होत आहे," असं ते म्हणाले. दीर्घकाळापासून बफे यांचे सहकारी असलेले ग्रेग एबेल या वर्षाच्या अखेरीस अधिकृतपणे बर्कशायरच्या सीईओ (CEO) पदाची सूत्रे स्वीकारतील.
आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
बफे यांनी आपल्या पत्राची सुरुवात वैयक्तिक शैलीत केली. "मी ९५ वर्षांपर्यंत जिवंत राहण्यासाठी माझ्या नशिबाबद्दल आभारी आणि आश्चर्यचकित आहे," असंही त्यांनी लिहिलं.
नन्सचे फिंगरप्रिंट्स
दिग्गज गुंतवणूकदारांनी १९३८ मध्ये घडलेली अपेंडिसाइटिसची (Appendicitis) घटना आठवली, जेव्हा ते आठ वर्षांचे असताना मृत्यूच्या जवळ पोहोचले होते. त्यांनी सांगितलं की त्यांना ओमाहा येथील एका कॅथोलिक रुग्णालयात कसं पाठवलं गेलं. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी नन्सचे बोटांचे ठसे घेतले होते, कारण त्यांना वाटले होते की एखाद्या दिवशी एखादी नन चुकीच्या मार्गावर जाईल आणि एफबीआयला त्या रेकॉर्डची गरज पडेल.
बफे यांनी आपलं घर म्हणतात त्या ओमाहाबद्दलही लिहिलं. ते म्हणाले की ते आणि बर्कशायर दोघेही ओमाहातील त्यांच्या आधारामुळे अधिक चांगले झाले. त्यांनी त्या लोकांनाही श्रद्धांजली वाहिली ज्यांनी त्यांच्या जीवनाला आकार दिला. यात चार्ली मुंगेर यांचाही समावेश होता, जे ६० वर्षांहून अधिक काळ बफे यांचे सहकारी राहिले. त्यांचं २०२३ मध्ये निधन झालं. "आमच्यात मतभेद होते, पण कधीही वाद झाला नाही. 'मी तुम्हाला सांगितल होतं' हे त्यांच्या शब्दकोशात नव्हतं," असंही त्यांनी नमूद केलं.
