Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पर्सनल लोनच्या नावाखाली तुमचं बँक खाते होईल रिकामं; अर्ज करण्यापूर्वी 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी तपासा

पर्सनल लोनच्या नावाखाली तुमचं बँक खाते होईल रिकामं; अर्ज करण्यापूर्वी 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी तपासा

Instant Loan : वैयक्तिक कर्जाच्या नावाखाली तुम्हाला लाखो रुपयांना फसवले जाऊ शकते. होय तुम्ही बरोबर वाचलत. पर्सनल लोन घेण्यासंदर्भात दिवसभरात तुम्हाला एखादा तरी कॉल येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:14 IST2025-10-27T14:35:52+5:302025-10-27T15:14:18+5:30

Instant Loan : वैयक्तिक कर्जाच्या नावाखाली तुम्हाला लाखो रुपयांना फसवले जाऊ शकते. होय तुम्ही बरोबर वाचलत. पर्सनल लोन घेण्यासंदर्भात दिवसभरात तुम्हाला एखादा तरी कॉल येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

How to Spot a Fake Loan App RBI Guidelines and Safety Tips to Protect Your Data and Money | पर्सनल लोनच्या नावाखाली तुमचं बँक खाते होईल रिकामं; अर्ज करण्यापूर्वी 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी तपासा

पर्सनल लोनच्या नावाखाली तुमचं बँक खाते होईल रिकामं; अर्ज करण्यापूर्वी 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी तपासा

Instant Loan : पैशाची गरज कधी कोणाला कुठे लागेल काही सांगता येत नाही. अशा वेळी '१० मिनिटांत इन्स्टंट लोन' किंवा 'झटपट कॅश' देणाऱ्या आकर्षक जाहिराती कोणत्याही देवदुतापेक्षा कमी वाटत नाहीत. मात्र, नेमका हाच क्षण असतो, जेव्हा फसवे लोक तुमच्या गरजेचा फायदा घेण्यासाठी जाळे टाकून बसलेले असतात. हे लोक एखाद्या मोठ्या आणि विश्वासार्ह बँक किंवा एनबीएफसीचा नाव वापरुन कमी व्याजदर तसेच त्वरित मंजुरीचे आमिष दाखवतात.

फसवणूक कशी टाळायची?

  • आरबीआयच्या यादीत नाव तपासा: कंपनीचे नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत बँका किंवा एनबीएफसीच्या यादीत आहे का, हे सर्वात आधी तपासा. त्यांची अधिकृत वेबसाइट तपासा. वेबसाइटचा पत्ता व्यावसायिक आहे का? त्यावर कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आणि संपर्क क्रमांक स्पष्टपणे लिहिलेला आहे का? जर पत्ता अस्पष्ट असेल किंवा माहिती नसेल, तर लगेच सावध व्हा.
  • ॲप्स आणि लिंक्सकडे लक्ष द्या: आजकाल फसवणुकीचे मोठे माध्यम बनावट ॲप्स आहेत. जर कोणी तुम्हाला एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवरून ॲप (APK फाईल) इन्स्टॉल करण्यास सांगितले, तर अशी चूक करू नका. विश्वासार्ह कंपन्या नेहमी तुम्हाला गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरूनच ॲप डाउनलोड करण्यास सांगतात.
  • 'आधी पैसे भरा, मग कर्ज घ्या' : फक्त ९९९ रुपये भरा आणि तुमचे कर्ज पक्के करा," हे फसवेगिरी करणाऱ्यांचे सर्वात जुने आणि प्रभावी तंत्र आहे.
  • ते तुम्हाला 'प्रोसेसिंग फी', 'फाइल चार्ज', 'विमा शुल्क' किंवा 'जीएसटी' सारख्या शब्दांच्या जाळ्यात अडकवतात.
  • तुमचे कर्ज मंजूर झाले आहे, ते फक्त तुमच्या खात्यात पाठवण्यासाठी तुम्हाला ९९९ रुपये ते ४,९९९ रुपयांपर्यंतची एक छोटी रक्कम आधी भरावी लागेल, असे ते सांगतात. नेमके इथेच तुम्ही थांबले पाहिजे.
  • कोणतीही कायदेशीर बँक किंवा एनबीएफसी कर्ज देण्यापूर्वी तुमच्याकडून कोणतीही फी मागत नाही. जे काही वैध शुल्क (उदा. प्रोसेसिंग फी) असते, ते नेहमी तुमच्या मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेतून कापले जाते आणि तुम्हाला उरलेली रक्कम दिली जाते. जर कोणी तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी आधी पैसे मागत असेल, तर ती निश्चितपणे फसवणूक आहे.

ईमेल आणि संपर्क 
बँक कधीही खासगी व्हॉट्सॲप नंबरवरून किंवा मोफत असलेल्या जीमेल/याहू आयडीवरून तुमच्याशी संपर्क साधत नाहीत. त्यांचे ईमेल आयडी नेहमी अधिकृत (उदा. @bankname.com) असतात. फसवणूक करणाऱ्यांच्या संदेशात स्पेलिंगच्या चुका, खूप जास्त दबाव आणणारे शब्द ("त्वरा करा," "ऑफर संपत आहे") आणि अस्पष्ट आश्वासने असतात.
कर्जाच्या अटी 
खरा कर्ज अधिकारी तुम्हाला व्याजदर, कर्जाचा कालावधी, ईएमआय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एपीआर म्हणजे कर्जाची एकूण वार्षिक किंमत स्पष्टपणे समजावून सांगतो. फसवणूक करणारे फक्त "सर्वोत्तम ऑफर" असे सांगून तुम्हाला अडकवू पाहतात.

दस्ताऐवज आणि ॲप परवानग्यांबाबत सतर्क राहा
तुम्ही १००% खात्री मिळेपर्यंत आपले पॅन, आधार, सेल्फी किंवा बँक स्टेटमेंट कोणासोबतही शेअर करू नका. अनेक बनावट ॲप्स तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरी, कॅमेरा आणि माइकचा ॲक्सेस मागतात. कर्ज देण्यासाठी त्यांना तुमच्या मित्रांच्या नंबरची किंवा फोटोंची काय गरज आहे?

हा डेटा चोरून ते नंतर तुम्हाला आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्सना ब्लॅकमेल करू शकतात. जर एखाद्या ॲपने अनावश्यक परवानग्या मागितल्या, तर त्यास त्वरित 'डिनाय' करा.

वाचा - EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार

जर फसलात, तर काय करावे?

  • जर तुम्ही कोणतीही फी भरली असेल, तर त्वरित तुमच्या बँकेशी संपर्क साधून ते खाते ब्लॉक करा आणि त्या व्यवहाराची तक्रार नोंदवा.
  • राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर जाऊन त्वरित तक्रार दाखल करा.
  • जर तुम्ही कागदपत्रे शेअर केली असतील, तर आपले सर्व पासवर्ड बदला आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू करा. शक्य असल्यास, आपला क्रेडिट स्कोअर गोठवण्याचा विचार करा.

Web Title : पर्सनल लोन घोटाला: बैंक खाता बचाने के लिए इन 3 चीजों की जांच करें।

Web Summary : तुरंत लोन घोटालों से सावधान! आरबीआई पंजीकरण सत्यापित करें, संदिग्ध ऐप्स से बचें और कभी भी अग्रिम शुल्क का भुगतान न करें। बैंक अग्रिम भुगतान नहीं मांगते; अपने वित्तीय डेटा को सुरक्षित रखें।

Web Title : Personal loan scams: Verify these 3 things to protect your bank account.

Web Summary : Beware of instant loan scams! Verify RBI registration, avoid suspicious apps, and never pay upfront fees. Banks don't ask for advance payments; protect your financial data.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.