PAN Card Inactive : पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने दिलेली ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आता संपली आहे. नियमानुसार, ज्या करदात्यांनी विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून 'निष्क्रिय' करण्यात आले आहे. पॅन कार्ड इनअॅक्टिव्ह झाल्यामुळे तुमचे बँक व्यवहार, गुंतवणूक आणि टॅक्सशी संबंधित सर्व कामे ठप्प होऊ शकतात. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड अजूनही चालू आहे की बंद झाले आहे, हे तातडीने तपासणे गरजेचे आहे.
तुमचे पॅन कार्ड 'सक्रीय' आहे की नाही? असे तपासा ऑनलाइन
तुमच्या पॅन कार्डचे स्टेटस तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाने अत्यंत सोपी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाच्या incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
- होमपेजवर डाव्या बाजूला असलेल्या 'Quick Links' या सेक्शनमध्ये जा.
- येथे तुम्हाला 'Verify Your PAN' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- तुमचा पॅन नंबर, पूर्ण नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर अचूक भरा आणि 'Continue' वर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करून 'Validate' बटणावर क्लिक करा.
- जर तुमचे पॅन कार्ड सक्रिय असेल, तर स्क्रीनवर 'PAN is Active and details are as per PAN' असा संदेश दिसेल.
वाचा - एका दिवसात चांदीची १३ हजारांची झेप; तर सोन्यातही मोठी वाढ; आज २४ कॅरेटचा दर काय?
पॅन 'निष्क्रीय' असण्याचे ५ मोठे धोके
- तुम्ही प्राप्तिकर परतावा भरू शकणार नाही आणि तुमचे प्रलंबित रिफंडही अडकून पडतील.
- पॅन कार्ड नसल्यामुळे तुमच्या उत्पन्नावरील टॅक्स २० टक्क्यांसारख्या उच्च दराने कापला जाईल.
- शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्याशी संबंधित सर्व व्यवहार थांबवले जातील.
- ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करताना किंवा नवीन खाते उघडताना अडचणी येतील.
- बँकिंग किंवा विम्याशी संबंधित केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
