Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?

LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?

LIC Investment: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) म्हणजेच एलआयसीदेखील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असते. दरम्यान, एलआयसीनं कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, याची माहिती नुकतीच समोर आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 08:49 IST2025-12-17T08:47:53+5:302025-12-17T08:49:42+5:30

LIC Investment: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) म्हणजेच एलआयसीदेखील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असते. दरम्यान, एलआयसीनं कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, याची माहिती नुकतीच समोर आली.

How much investment does LIC have in which indian company Government gave important information Which companies including Tata Reliance Adani | LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?

LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?

LIC Investment: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) म्हणजेच एलआयसीदेखील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असते. दरम्यान, एलआयसीनं कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, याची माहिती नुकतीच समोर आली. दरम्यान एलआयसीनं सर्वाधिक गुंतवणूक टाटा समूहात केली आहे, ज्याची रक्कम ८८,४०४ कोटी रुपये आहे. त्यानंतर एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) ८०,८४३ कोटी रुपये आणि रिलायन्स समूहात ६०,०६५.५६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही माहिती १६ डिसेंबर रोजी संसदेत देण्यात आली.

सरकारतर्फे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितलं की, अदानी समूहात एलआयसीनं ४७,६३३.७८ कोटी रुपये आणि एसबीआयमध्ये (SBI) ४६,६२१.७६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

LIC च्या गुंतवणुकीची यादी

मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं की, एलआयसीनं ३५ देशांतर्गत कंपन्या आणि समूहांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी त्या व्यावसायिक समूहांची यादी देखील शेअर केली, ज्यात एलआयसीची एकत्रित गुंतवणूक ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या यादीत एल अँड टी (L&T), युनिलिव्हर, आयडीबीआय बँक (IDBI Bank), एम अँड एम (M&M) आणि आदित्य बिर्ला समूह यांचा समावेश आहे. एलआयसीची या टॉप पाच समूहांमध्ये एकूण ३.२३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, तर ३५ कंपन्यांमधील एकूण गुंतवणूक ७.८७ लाख कोटी रुपये आहे.

LIC मध्ये गुंतवणुकीचा निर्णय कसा घेतला जातो?

एलआयसीकडे गुंतवणुकीसाठी बोर्ड अप्रूव्ड इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे. हे धोरण गुंतवणूक विभागासाठी एक मार्गदर्शक तत्त्व किंवा संरचना आहे, जे कंपनीचा पैसा कसा आणि कोणत्या नियमांनुसार गुंतवला जाईल हे ठरवते. यामुळे सर्व गुंतवणूक जबाबदारीनं केली जातं याची खात्री होतं, असं चौधरी यांनी नमूद केलं.

गुंतवणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय 'गुंतवणूक समिती' (Investment Committee) द्वारे घेतले जातात. ही समिती बोर्डाची एक उप-समिती आहे आणि यात कंपनीचे सीईओ आणि एमडी, इतर एमडी आणि स्वतंत्र संचालक यांचा समावेश असतो. ही समिती कंपन्यांमध्ये इक्विटी आणि डेट गुंतवणुकीशी संबंधित सर्व निर्णय घेते. म्हणजेच, एलआयसीनं कोणत्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत किंवा कर्ज पुरवावे, जेणेकरून गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर राहील, हे ठरवलं जातं.

कंपनी 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर'चे पालन करते

पंकज चौधरी यांनी सांगितले की, एलआयसी आपले सर्व गुंतवणुकीचे कार्य 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' (SOP) नुसार करते. ही एसओपी नियमांची आणि प्रक्रियांची एक चौकट आहे, ज्याला एलआयसीची गुंतवणूक समिती मंजुरी देते आणि बोर्डाला त्याची माहिती दिली जाते. एसओपीचे दरवर्षी पुनरावलोकन केले जाते आणि आवश्यकतेनुसार नियमांनुसार अपडेट केलं जातं.

गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी एलआयसी नेहमी कठोर तपासणी, जोखीम मूल्यांकन आणि फिड्युशियरी कम्प्लायन्सचा पाठपुरावा केला जातो. याचा अर्थ एलआयसी ही गुंतवणूक सुरक्षित आणि नियमांनुसार आहे याची खात्री करते. यासाठी एलआयसी 'इन्शुरन्स ॲक्ट, १९३८', 'इरडा' (IRDAI), 'आरबीआय' (RBI) आणि जिथे लागू असेल तिथे 'सेबी'च्या नियमांचं पालन केलं जात असल्याचं चौधरी म्हणाले.

सप्टेंबर २०२५ पर्यंत ७ प्रमुख क्षेत्रांमध्ये गुंतवणूक

सप्टेंबर २०२५ पर्यंत, एलआयसीची गुंतवणूक ७ प्रमुख क्षेत्रांमध्ये २,२७,३२७.८४ कोटी रुपये इतकी होती. यामध्ये सिमेंट, एफएमसीजी, पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स, न्यूज आणि ब्रॉडकास्टिंग यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. यावरून एलआयसीने अनेक मोठ्या आणि वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवल्याचं दिसून येतं.

Web Title : LIC निवेश: सरकार ने बताई शीर्ष कंपनियां; टाटा, रिलायंस, अडानी शामिल

Web Summary : एलआईसी का सबसे बड़ा निवेश टाटा समूह, एचडीएफसी बैंक और रिलायंस में है। सरकार ने खुलासा किया कि एलआईसी ने 35 घरेलू कंपनियों में निवेश किया है, जिसमें अडानी और एसबीआई में महत्वपूर्ण हिस्सेदारी है। निवेश निर्णय सुरक्षा सुनिश्चित करते हैं।

Web Title : LIC Investments: Government Reveals Top Companies; Tata, Reliance, Adani Included

Web Summary : LIC's largest investments are in Tata Group, HDFC Bank, and Reliance. The government disclosed LIC has invested in 35 domestic companies, with significant stakes in Adani and SBI. Investment decisions follow strict guidelines and SOPs ensuring security.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.