Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ATM Charges : देशातील वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या श्रेणीतील एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डवर वेगवेगळे शुल्क आकारतात. तुमच्याकडे कोणत्या बँकेचे डेबिट कार्ड आहे? त्यासाठी तुमच्याकडून किती शुल्क आकारले जाते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:01 IST2025-04-25T15:48:23+5:302025-04-25T16:01:09+5:30

ATM Charges : देशातील वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या श्रेणीतील एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डवर वेगवेगळे शुल्क आकारतात. तुमच्याकडे कोणत्या बँकेचे डेबिट कार्ड आहे? त्यासाठी तुमच्याकडून किती शुल्क आकारले जाते?

how much do banks charge for atm card services in one year | १ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ATM Charges : सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे किमान २ तरी बँकेत खाते असतेच. देशातील बँकिंग सेवा देणाऱ्या सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना एटीएम सुविधा देखील पुरवतात. या प्रत्येक सेवेसाठी बँक तुमच्याकडून विशिष्ट शुल्क आकारत असते. विशेषकरुन बँका तुमच्याकडून एटीएम कार्डवर विविध प्रकारचे शुल्क आकारते. यावर कधीकधी जीएसटी देखील आकारला जातो. एटीएममधून एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास तुम्हाला जीएसटीसह मोठा शुल्क भरावा लागेल. यासाठी, सर्व बँका तुमच्याकडून एटीएम कार्डवर वार्षिक शुल्क आकारतात. तुमची बँक तुमच्याकडून किती शुल्क आकारते माहिती आहे का?

एटीएम कार्ड वापरण्यावर २००० रुपयांपर्यंत चार्ज
देशातील वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या श्रेणीतील एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डवर वेगवेगळे शुल्क आकारतात. हे शुल्क ० ते २००० रुपयांपर्यंत असू शकते. एएमसीसोबत (वार्षिक देखभाल शुल्क) तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागतो. खरंतर, एटीएम कार्डमुळे ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात, त्यानुसार एएमसी तुमच्याकडून शुल्क आकारते. याशिवाय, अनेक खाजगी बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कस्टमाइज्ड कार्ड बनवतात, ज्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. एटीएम सेवा वापरण्यासाठी ग्राहकाच्या बँक खात्यातून वर्षातून एकदा हे शुल्क आपोआप कापले जाते.

वाचा - सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वार्षिक देखभाल शुल्क टाळता येतो का?
बँका प्रत्येक कार्ड व्यवहारासाठी मजकूर संदेश आणि ईमेल पाठवून त्यांच्या ग्राहकांना या शुल्काची माहिती देतात. याशिवाय, या शुल्काच्या बदल्यात तुमचे कार्ड सक्रिय आणि कार्यरत ठेवले जाते. बँकांकडे असे अनेक पर्याय आहेत ज्यात तुम्हाला एटीएम सेवांसाठी कोणत्याही प्रकारचे एएमसी द्यावे लागत नाही. याला बेसिक डेबिट कार्ड म्हणतात, जे फक्त रोख पैसे काढण्यासाठी वापरले जातात. परंतु, सहसा बँका स्वतः त्यांच्या ग्राहकांना या कार्डांची माहिती देत ​​नाहीत. यासाठी ग्राहकांना स्वतः बँकेला विचारावे लागेल की त्यांना एएमसीशिवाय बेसिक एटीएम कार्ड हवे आहे. 

Web Title: how much do banks charge for atm card services in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.