Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 10 मिनिटांत डिलिव्हरी कशी शक्य? जाणून घ्या Zepto, Blinkit अन् Swiggy चे बिझनेस मॉडेल...

10 मिनिटांत डिलिव्हरी कशी शक्य? जाणून घ्या Zepto, Blinkit अन् Swiggy चे बिझनेस मॉडेल...

Zepto, Blinkit, Swiggy Instamart आणि Flipkart Minutes यांसारख्या कंपन्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:54 IST2025-12-29T14:52:47+5:302025-12-29T14:54:41+5:30

Zepto, Blinkit, Swiggy Instamart आणि Flipkart Minutes यांसारख्या कंपन्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

How 10 Minute Delivery Model Works: How is delivery possible in 10 minutes? Learn about the business model of Zepto, Blinkit | 10 मिनिटांत डिलिव्हरी कशी शक्य? जाणून घ्या Zepto, Blinkit अन् Swiggy चे बिझनेस मॉडेल...

10 मिनिटांत डिलिव्हरी कशी शक्य? जाणून घ्या Zepto, Blinkit अन् Swiggy चे बिझनेस मॉडेल...

How 10 Minute Delivery Model Works: चहा करायला गॅसवर भांडं ठेवलं आणि लक्षात आलं की, साखर संपलीये! काही वर्षांपूर्वी ही अडचण होती, पण आज मोबाईलवर ऑर्डर टाकताच अवघ्या 10 मिनिटांत साखर दारात येते. हे जादूसारखे वाटत असले तरी Zepto, Blinkit, Swiggy Instamart आणि Flipkart Minutes यांसारख्या कंपन्यांनी डेटा, टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट प्लॅनिंगच्या जोरावर हे शक्य करून दाखवले आहे. मोठ्या शहरांमध्ये ही सेवा झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

क्विक कॉमर्स म्हणजे नेमकं काय?

क्विक कॉमर्स हे असे व्यवसाय मॉडेल आहे, ज्यामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू अत्यंत कमी वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात. यामध्ये डिलिव्हरी होणाऱ्या वस्तूंचं वेअरहाऊस ग्राहकाच्या घरापासून साधारण 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असते. मोठी ऑर्डर किंवा लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीपेक्षा ‘शेजारपाजारातून तत्काळ पुरवठा’ यावर या मॉडेलचा भर असतो. त्यामुळे वेग (स्पीड) हाच या सेवांचा सर्वात मोठा आधार आहे.

तुमच्या परिसरात गोदामं...

10 मिनिटांच्या डिलिव्हरीमागील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे डार्क स्टोअर्स. ही कुठलीही सामान्य किराणा दुकाने नसून, दाट लोकवस्तीच्या भागांजवळ उभारलेली लहान गोदामे असतात. अनेकदा ही स्टोअर्स बेसमेंट, अरुंद गल्ली किंवा रिकाम्या व्यावसायिक जागांमध्ये कार्यरत असतात. येथे ग्राहकांना थेट खरेदी करता येत नाही; सर्व व्यवहार फक्त अ‍ॅपद्वारेच होतात. स्टोअर जवळ असल्याने डिलिव्हरीचा वेळ आपोआप कमी होतो.

डेटा ठरवतो काय, कुठे आणि कधी मिळेल

डार्क स्टोअरमध्ये कोणता माल ठेवायचा, हे केवळ अंदाजावर ठरत नाही. कंपन्या सतत डेटा अ‍ॅनालिटिक्सचा वापर करून पाहतात की, कोणत्या परिसरात, कोणत्या वेळेला, कोणत्या वस्तूंची जास्त मागणी असते. उदाहरणार्थ, एखाद्या भागात रात्री आईस्क्रीम किंवा स्नॅक्सची विक्री जास्त होत असेल, तर त्या स्टोअरमध्ये तोच साठा वाढवला जातो. यामुळे ग्राहकाने ऑर्डर देण्याआधीच आवश्यक वस्तू जवळच्या स्टोअरमध्ये उपलब्ध असतात.

ऑर्डर देण्याआधीच सुरू होते तयारी

ग्राहक अ‍ॅपवर एखादी वस्तू शोधताच कंपनीची सिस्टीम सक्रिय होते. सर्व्हर जवळच्या डार्क स्टोअरमधील स्टॉक तपासतो, कोण कर्मचारी ऑर्डर पॅक करेल हे ठरवतो. काही वेळा तर पेमेंट होण्याआधीच पॅकिंगची प्रक्रिया सुरू होते. स्टोअरमधील वस्तू अशा पद्धतीने मांडलेल्या असतात की, पॅकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याला कमीत कमी चालावे लागेल. त्यामुळे संपूर्ण ऑर्डर साधारण 60 ते 90 ० सेकंदांत तयार होते.

रिअल-टाइम GPS आणि रायडरचे अचूक नियोजन

डार्क स्टोअरबाहेर डिलिव्हरी रायडर्स आधीच सज्ज असतात. GPS आणि AI आधारित सॉफ्टवेअर हे ठरवते की, कोणता रायडर सर्वात जवळ आहे आणि कोणत्या मार्गावर वाहतूक कमी आहे. शहरातील गल्लीबोळ, वळणे आणि ट्रॅफिक पॅटर्नची रिअल-टाइम माहिती सिस्टीमकडे असते. त्यामुळे रायडर वेगात किंवा धोकादायक पद्धतीने गाडी न चालवता वेळेत डिलिव्हरी करू शकतो.

10 मिनिटांच्या डिलिव्हरीने बदललेल्या खरेदीच्या सवयी

या झटपट डिलिव्हरी सेवेमुळे ग्राहकांची खरेदी करण्याची पद्धतच बदलली आहे. आता अनेक जण महिन्याभराचे किराणा सामान एकदम खरेदी करत नाहीत, कारण गरज पडताच सामान लगेच मिळेल याची खात्री असते. यामुळे वारंवार, पण कमी प्रमाणात खरेदी वाढली आहे. याचा थेट फायदा क्विक कॉमर्स कंपन्यांना होत आहे. मात्र, नियोजनाची सवय कमी होत चालल्याचे सामाजिक निरीक्षणही व्यक्त केलं जात आहे.

क्विक कॉमर्सचं भविष्य

Zepto, Blinkit, Swiggy Instamart आणि Dunzo यांसारख्या प्लॅटफॉर्म्स आपल्या नेटवर्कचा आणि तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार करत आहेत. भविष्यात डिलिव्हरी आणखी जलद, अधिक वैयक्तिकृत आणि पूर्णपणे डेटा-आधारित होण्याची शक्यता आहे. 10 मिनिटांची डिलिव्हरी ही आता केवळ सुविधा न राहता, शहरी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनत चालली आहे. टेक्नोलॉजी, डेटा आणि स्थानिक उपलब्धतेचे अचूक संयोजन, हेच क्विक कॉमर्सच्या यशाचे गमक आहे.

Web Title : ज़ेप्टो, ब्लिंकिट, स्विगी की 10 मिनट डिलीवरी: बिजनेस मॉडल समझाया गया

Web Summary : क्विक कॉमर्स पास के गोदामों का उपयोग करके आवश्यक वस्तुओं को तेजी से वितरित करता है। डेटा एनालिटिक्स स्टॉक को अनुकूलित करता है। रियल-टाइम जीपीएस तेजी से डिलीवरी सुनिश्चित करता है। इससे खरीदारी की आदतें बदलती हैं, बार-बार, छोटे ऑर्डर पसंद किए जाते हैं। तेज़ डिलीवरी शहरी जीवनशैली को नया आकार देती है।

Web Title : Zepto, Blinkit, Swiggy's 10-Minute Delivery: Business Models Explained

Web Summary : Quick commerce delivers essentials rapidly using nearby warehouses. Data analytics optimizes stock. Real-time GPS ensures swift delivery. This changes shopping habits, favoring frequent, smaller orders. Fast delivery reshapes urban lifestyles.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.