Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ६० वर्षांवरील नागरिकांना होम लोन मिळते का? नियम काय सांगतात? जाणून घ्या...

६० वर्षांवरील नागरिकांना होम लोन मिळते का? नियम काय सांगतात? जाणून घ्या...

Home Loan : ज्येष्ठ नागरिकांना बँका होम लोन देत नाहीत, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 14:49 IST2026-02-08T14:47:47+5:302026-02-08T14:49:05+5:30

Home Loan : ज्येष्ठ नागरिकांना बँका होम लोन देत नाहीत, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे.

Home Loan: Can citizens above 60 years of age get a home loan? What are the rules ? Find out... | ६० वर्षांवरील नागरिकांना होम लोन मिळते का? नियम काय सांगतात? जाणून घ्या...

६० वर्षांवरील नागरिकांना होम लोन मिळते का? नियम काय सांगतात? जाणून घ्या...

Home Loan : ६० वर्षांची वयोमर्यादा ओलांडली की, बँका होम लोन देत नाहीत, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. मात्र प्रत्यक्षात ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही बँकांकडून होम लोन मिळू शकते, मात्र यासाठी काही अटी आणि कडक नियम लागू होतात. 

आजच्या घडीला स्वतःचे घर खरेदी करणे अनेकांसाठी अवघड होत चालले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक बँकांच्या मदतीने होम लोन घेऊन घर खरेदी करतात. मात्र ६० वर्षांनंतर बँकांची कर्ज देण्याची पद्धत बदलते आणि त्या अधिक सावध भूमिका घेतात.

वयापेक्षा उत्पन्न अधिक महत्त्वाचे

बँकांच्या दृष्टीने वयापेक्षा नियमित आणि स्थिर उत्पन्न अधिक महत्त्वाचे असते. जर तुम्ही निवृत्त (रिटायर) झाले असाल, तरीही तुमच्याकडे नियमित पेन्शन, घरभाड्यापासून मिळणारे उत्पन्न, गुंतवणुकीवरील व्याज, किंवा व्यवसायातून येणारी कमाई असल्यास तुम्ही होम लोनसाठी अर्ज करू शकता. बँक फक्त हे पाहते की, तुम्ही ईएमआय वेळेवर भरू शकता की नाही.

सरकारी पेन्शनधारकांसाठी परिस्थिती तुलनेने सोपी असते, कारण त्यांचे उत्पन्न निश्चित आणि स्थिर असते. मात्र उत्पन्नाचे स्रोत अनेक असतील किंवा तुम्ही स्वयंरोजगारात असाल, तर बँक अधिक कागदपत्रांची तपासणी करू शकते. जर ६० वर्षांनंतरही नोकरी करत असाल, तर तुमची निवृत्तीची वयोमर्यादा बँकेसाठी महत्त्वाची ठरते. त्याच आधारावर कर्जाचा कालावधी ठरवला जातो.

होम लोनची कालमर्यादा किती असते?

ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे लोनचा कालावधी. बहुतेक बँका अशी अट घालतात की, होम लोन ७०, ७५ किंवा जास्तीत जास्त ८० वर्षांपर्यंत पूर्ण फेडले गेला पाहिजे. याचा अर्थ असा की, वय जितके जास्त, तितका लोनचा कालावधी कमी. परिणामी, ईएमआयचा हप्ता जास्त होण्याची शक्यता असते, जो काही ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या जड ठरू शकतो.

क्रेडिट स्कोरची भूमिका महत्त्वाची

६० किंवा ६५ वर्षांच्या वयात क्रेडिट स्कोर फार महत्त्वाचा ठरतो. जर तुमचा क्रेडिट स्कोर ७५० किंवा त्याहून अधिक असेल, तर कमी व्याजदर, आणि लोन मंजुरीची शक्यता वाढते. पूर्वी कर्जफेडीत उशीर किंवा डिफॉल्ट झाला असेल, तर बँक कर्ज देताना संकोच करू शकतात किंवा जास्त व्याजदर आकारू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट रिपोर्ट तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

को-अप्लिकंट घेतल्यास दिलासा

अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या जीवनसाथीला, किंवा कमावत्या मुला-मुलीला को-अप्लिकंट म्हणून लोनमध्ये सामील करतात. जर को-अप्लिकंट वयाने तरुण आणि उत्पन्न स्थिर असेल, तर बँक लोनचा कालावधी वाढवू शकते आणि ईएमआयचा आर्थिक बोजादेखील कमी होऊ शकतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी होम लोन घेणे अधिक सोपे आणि सुरक्षित ठरू शकते.

Web Title : वरिष्ठ नागरिकों के लिए होम लोन: उम्र नहीं, नियम जानिए!

Web Summary : वरिष्ठ नागरिक कुछ शर्तों के साथ होम लोन पा सकते हैं। उम्र से ज़्यादा आय मायने रखती है; पेंशन या आय के अन्य स्रोत महत्वपूर्ण हैं। क्रेडिट स्कोर और सह-आवेदक अनुमोदन की संभावना और ऋण शर्तों को बेहतर बनाते हैं, जिससे घर का मालिक बनना संभव है।

Web Title : Home Loans for Seniors: Age is No Bar, Know the Rules!

Web Summary : Seniors can get home loans with specific terms. Income matters more than age; pension or other income streams are crucial. Credit score and co-applicants improve approval chances and loan terms, making homeownership possible.