नवी दिल्ली : घोटाळ्यांचे आरोप करून अदानी उद्योगसमूहास जेरीस आणणारी अमेरिकी शॉर्ट सेलिंग संस्था ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ अखेर बंद करण्यात आली. कंपनीचे संस्थापक नेट अँडरसन यांनी बुधवारी ही घोषणा केली. ४० वर्षीय अँडरसन यांनी २०१७ मध्ये ही कंपनी सुरू केली होती.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणास अवघे काही दिवस उरलेले असताना अँडरसन यांनी कंपनी बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हिंडेनबर्ग बंद करण्यामागे राजकीय दबाव आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
अँडरसन म्हणाले...
अँडरसन यांनी सांगितले की, आम्ही जे प्रकल्प हाती घेतले होते, ते आता पूर्ण झाले आहेत. विशेषत: पोंझी प्रकरणांवरील काम आम्ही पूर्ण केले आहे. कंपनी बंद करण्याचा निर्णय गतवर्षीच्या अखेरीसच आम्ही घेतला होता. त्याबाबत कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांनाही कळवले होते.
कितने गाजी आए, कितने गाजी गए : अदानी समूह
‘कितने गाजी आए, कितने गाजी गए’ अशा शब्दांत अदानी समूहाचे मुख्य वित्त अधिकारी जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी हिंडेनबर्गची ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये संभावना केली आहे. एवढे एकच वाक्य त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. त्यासोबत कोणाचेही नाव घेतले नाही.
कोणत्या कंपन्यांवर केला होता घोळांचा आरोप?
वर्ष कंपनी देश
२०१६ आरडी लिगल अमेरिका
२०१७ पर्शिंग गोल्ड अमेरिका
२०१७ ओपको हेल्थ अमेरिका
२०१८ ॲफ्रिया कॅनडा
२०१९ ब्लूम एनर्जी अमेरिका
२०२० एचएफ फूड्स अमेरिका
२०२० निकोला अमेरिका
२०२२ ट्टिटर अमेरिका
२०२३ अदानी समूह भारत