Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI नं १४ बँकांना ठोठावला भरभक्कम दंड; असं आहे कारण

RBI नं १४ बँकांना ठोठावला भरभक्कम दंड; असं आहे कारण

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. एका उद्योग समूहाला देण्यात आलेल्या कर्जाच्या खात्याची छाननी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यावरून ही कारवाई करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 11:13 IST2021-07-09T11:12:44+5:302021-07-09T11:13:05+5:30

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. एका उद्योग समूहाला देण्यात आलेल्या कर्जाच्या खात्याची छाननी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यावरून ही कारवाई करण्यात आली.

heavily fined to 14 banks by reserve bank of india rbi | RBI नं १४ बँकांना ठोठावला भरभक्कम दंड; असं आहे कारण

RBI नं १४ बँकांना ठोठावला भरभक्कम दंड; असं आहे कारण

नवी दिल्ली : बिगर-बँकिंग वित्त संस्थांना कर्ज देणे आणि मोठ्या कर्जांचा डाटा ठेवणे यासंबंधी घालून देण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे १४ बँकांना रिझर्व्ह बँकेने मोठ्या रकमेचा दंड ठोठावला आहे. 

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. एका उद्योग समूहाला देण्यात आलेल्या कर्जाच्या खात्याची छाननी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यावरून ही कारवाई करण्यात आली. या उद्योग समूहाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, दंड ठोठावण्यात आलेल्या बँकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.यामध्ये  बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुसी, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करुर वैश्य बँक, पंजाब ॲण्ड सिंध बँक, साऊथ इंडिया बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू व काश्मीर बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. 
 

Web Title: heavily fined to 14 banks by reserve bank of india rbi