lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुम्हीही आहात का HDFC बँक ग्राहक?; रात्रीपासून डेबिट कार्ड वापरता येणार नाही

तुम्हीही आहात का HDFC बँक ग्राहक?; रात्रीपासून डेबिट कार्ड वापरता येणार नाही

बँकेने त्यांच्या Credit Card बाबतही मेन्टेन्स शेड्युल्ड जारी केला आहे.

By प्रविण मरगळे | Published: February 3, 2021 01:48 PM2021-02-03T13:48:10+5:302021-02-03T13:50:59+5:30

बँकेने त्यांच्या Credit Card बाबतही मेन्टेन्स शेड्युल्ड जारी केला आहे.

HDFC Alert due to maintenance debit card services will not available | तुम्हीही आहात का HDFC बँक ग्राहक?; रात्रीपासून डेबिट कार्ड वापरता येणार नाही

तुम्हीही आहात का HDFC बँक ग्राहक?; रात्रीपासून डेबिट कार्ड वापरता येणार नाही

मुंबई - खासगी क्षेत्रातील HDFC बँकेने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सतर्क करत म्हटलंय की, मेन्टेन्स प्रक्रियेसाठी बँकेचे Debit Card शी निगडीत सर्व सुविधा ४ फेब्रुवारी रात्री १२.३० पासून सकाळी ५ पर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत ग्राहक ना डेबिट कार्डच्या माध्यमातून ATM मधून पैसे काढू शकणार ना कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार करू शकतील. रात्री १२.३० पासून सकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचा बँकींग व्यवहार आणि पेमेंट करता येणार नाही.

बँकेने त्यांच्या Credit Card बाबतही मेन्टेन्स शेड्युल्ड जारी केला आहे. बँकेचे ग्राहक ३ फेब्रुवारी २०२१ ला पहाटे २  ते ३ च्या दरम्यान क्रेडिट कार्डाशी निगडीत कोणत्याही सुविधेचा वापर करू शकणार नाही, याबाबत बँकेने ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकने (HDFC Bank) तिसर्‍या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. बँकेने या काळात मोठा नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर 18.1 टक्के वाढीसह बँकेचा निव्वळ नफा 8,758.3 कोटी आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एचडीएफसी बँकेने डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीचा शनिवारी निकाल जाहीर केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेचा निव्वळ नफा 7,416.48 कोटी होता. खासगी कर्ज पुरवठादाराचे निव्वळ व्याज उत्पन्न (व्याज आणि मिळविलेल्या व्याजांमधील फरक) या तिमाहीच्या आढावा कालावधीत वार्षिक आधारावर 15.1 टक्क्यांनी वाढ होऊन ते 16,317.6 कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या वर्षी याच काळात ती 14,172.9 कोटी होती. बँकेने म्हटले आहे की एनआयआय (Net Interest Income) हे 15.6 %. वाढीचे दर आणि 4.2% च्या निव्वळ व्याज मार्जिनने होते.

Web Title: HDFC Alert due to maintenance debit card services will not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.