lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > HCL कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, कंपनी देणार 700 कोटींचा स्पेशल बोनस

HCL कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, कंपनी देणार 700 कोटींचा स्पेशल बोनस

hcl tech announces special bonus for employees : दहा अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 72,800 कोटी रुपये) उत्पन्न मिळविण्याच्या निमित्ताने कंपनीने सोमवारी आपल्या कर्मचार्‍यांना 700 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा विशेष बोनस जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 02:19 PM2021-02-08T14:19:29+5:302021-02-08T15:22:18+5:30

hcl tech announces special bonus for employees : दहा अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 72,800 कोटी रुपये) उत्पन्न मिळविण्याच्या निमित्ताने कंपनीने सोमवारी आपल्या कर्मचार्‍यांना 700 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा विशेष बोनस जाहीर केला आहे.

hcl tech announces special bonus for employees worth 700 crore rupees | HCL कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, कंपनी देणार 700 कोटींचा स्पेशल बोनस

HCL कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, कंपनी देणार 700 कोटींचा स्पेशल बोनस

नवी दिल्ली : देशातील दिग्गज टेक कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजने (HCL Technologies) आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. दहा अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 72,800 कोटी रुपये) उत्पन्न मिळविण्याच्या निमित्ताने कंपनीने सोमवारी आपल्या कर्मचार्‍यांना 700 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा विशेष बोनस जाहीर केला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एचसीएल टेक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी 2021 मध्ये कर्मचार्‍यांना विशेष बोनस दिला जाईल आणि याचा परिणाम कंपनीद्वारे गेल्या महिन्यात सांगितलेल्या आर्थिक वर्षाच्या 2020-21 मधील ईबीआयटीच्या (व्याज आणि कर पूर्व वेतन) निधीमध्ये या विशेष बोनसचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता.

कंपनी का देतेय बोनस?
एचसीएल टेक्नॉलॉजीजने म्हटले आहे की, २०२० मध्ये दहा अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या उत्पन्नाची पातळी ओलांडण्यासाठी एक लक्ष ठेवण्यात आले होते, यानुसार कंपनीकडून जगभरातील आपल्या कर्मचार्‍यांना एक वेळचा विशेष बोनस दिला जात आहे. ज्याची एकूण रक्कम 700 कोटींपेक्षा जास्त आहे. याचबरोबर, या आनंददायी प्रसंगी एक वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा असलेल्या सर्व कर्मचार्‍यांना दहा दिवसांच्या पगाराइतका बोनस मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

HR अधिकारी अप्पाराव व्ही व्ही यांच्याकडून माहिती
कोरोना संकटानंतरही एचसीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपली दृढ वचनबद्धता आणि उत्कटता दर्शविली आणि संस्थेच्या वाढीस हातभार लावला. 31 डिसेंबर 2020 पर्यंत एचसीएलच्या पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची संख्या 159682 होती, असे एचसीएल टेक्नोलॉजीजचे मुख्य मानव संसाधन (एचआर) अधिकारी अप्पाराव व्ही व्ही यांनी सांगितले.

कंपनीचा रेव्हेन्यू किती?
 2020 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 10 अब्ज डॉलर्स ओलांडला आहे. वार्षिक आधारावर यामध्ये 3.6 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना त्याची सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणून वर्णन केले. कंपनीने सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. 

Web Title: hcl tech announces special bonus for employees worth 700 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.