Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकेतून पैसे काढायचेत? चिंता नको, 'हे' सरकार घरपोच आणून देतंय, यासाठी फक्त...

बँकेतून पैसे काढायचेत? चिंता नको, 'हे' सरकार घरपोच आणून देतंय, यासाठी फक्त...

पोर्टलच्या माध्यमातून नागरिक घरी बसून बँकेत पैसे काढू शकतात किंवा जमा करु शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 07:08 PM2020-04-28T19:08:46+5:302020-04-28T19:17:58+5:30

पोर्टलच्या माध्यमातून नागरिक घरी बसून बँकेत पैसे काढू शकतात किंवा जमा करु शकतात.

haryana government starts doorstep delivery of cash you need to book slot only rkp | बँकेतून पैसे काढायचेत? चिंता नको, 'हे' सरकार घरपोच आणून देतंय, यासाठी फक्त...

बँकेतून पैसे काढायचेत? चिंता नको, 'हे' सरकार घरपोच आणून देतंय, यासाठी फक्त...

Highlightsदेशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. हरयाणा सरकारने एक वेब पोर्टल सुरु केले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. यात अनेक नागरिकांना पैसे काढण्यासाठी एटीएम किंवा बँकेत जावे लागत आहे. त्यामुळे या लॉकडाऊन दरम्यान प्रत्येकाच्या घरात बँकिंग सेवा पोहोचविण्याचा उपक्रम हरयाणा सरकारने सुरु केला आहे. 

यासाठी हरयाणा सरकारने एक वेब पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून हरयाणामधील नागरिक घरी बसून बँकेत पैसे काढू शकतात किंवा जमा करु शकतात. तसेच, नागरिक आपल्या सोयीनुसार टाइम स्लॉट सुद्धा बुक करु शकतात.

बँक स्लॉट बुक करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया अशी आहे...
1) सर्वात आधी कोणत्याही ब्राऊजरमध्ये https://bankslot.haryana.gov.in वर लॉन-इन करा.
2) त्यानंतर याठिकाणी ‘Book Your Bank Slot' वर क्लिक करा.
3) क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. ज्यामध्ये आपल्याला काही माहिती भरावी लागणार आहे.
4) या पेजवर आपले नाव, मोबाईल नंबर, बँकेचा आयएफएससी कोड भरावा लागेल.
5) तसेच, यासोबत आपल्या सोयीनुसार तारीख आणि अप्वाइंटमेंटची वेळ निवडावी लागेल.
6) सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर ‘apply for a bank slot’ वर क्लिक करावे. 
7) यानंतर हे पोर्टल आपल्याला नवीन वेबपेजवर घेऊन जाईल, ज्याठिकाणी आपल्याला स्लॉट बुकिंगचे कन्फर्मेशन मिळेल.
8) स्लॉट बुकिंगमध्ये कन्फर्मेशनला तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये सेव्ह करुन ठेवू शकता.

दरम्यान, याकडे आपले लक्ष असू देत की, हरयाणामधील कोणत्याही बँकेच्या शाखेत आपले खाते असेल तरच या सुविधेचा आपल्याला लाभ घेता येऊ शकतो. जर हरयाणा राज्याबाहेरील बँक खाते असेल तर, आपल्याला य सुविधेचा फायदा होणार नाही.
 

Web Title: haryana government starts doorstep delivery of cash you need to book slot only rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.