Lokmat Money > बिझनेस न्यूज > हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात

Gst Rate Cut : जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यानंतर, प्रवास आता स्वस्त होईल. अशा परिस्थितीत, दसरा आणि दिवाळीच्या दीर्घ आठवड्याच्या बुकिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:55 IST2025-09-08T16:54:49+5:302025-09-08T16:55:57+5:30

Gst Rate Cut : जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यानंतर, प्रवास आता स्वस्त होईल. अशा परिस्थितीत, दसरा आणि दिवाळीच्या दीर्घ आठवड्याच्या बुकिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

GST Rate Cut on Hotels, Restaurants to Boost Festive Season Travel | हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात

 Gst Rate Cut : महागाईपासून त्रस्त असलेल्या जनतेला सरकारने जीएसटीत कपात करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यातून कोणाकोणाला फायदा होईल हे समोर येईलच. पण, सध्यातरी या निर्णयानंतर पर्यटनाची आवड असणारे खुश झाले असणार. कारण नवीन बदलानंतर फिरण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील. हे बदल २२ सप्टेंबरपासून लागू होणार असले, तरी ट्रॅव्हल कंपन्यांकडे आतापासूनच बुकिंगबाबत फोन येऊ लागले आहेत. अनेक लोक सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमधील लाँग वीकेंडसाठी बुकिंगची चौकशी करत आहेत.”

हॉटेल आणि खाण्या-पिण्यावर फक्त ५ टक्के जीएसटी
जेवणावर पूर्वी १२ ते १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लागत होता, तो आता कमी होऊन ५ टक्के झाला आहे. म्हणजेच, तुम्ही जेव्हा ५००० रुपयांचे जेवण करत होता, तेव्हा १८ टक्क्यांच्या हिशोबाने ५९०० रुपये द्यावे लागत होते. पण आता ५ टक्क्यांच्या जीएसटी दरामुळे तुम्हाला ५२५० रुपये द्यावे लागतील. ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधील लोकांचे म्हणणे आहे की, या बदलांनंतर हॉटेल आणि खाण्यावर जवळपास ७ ते २० टक्क्यांपर्यंत बचत होईल, ज्याचा थेट परिणाम पॅकेजच्या किमतीवर होईल.

वाचा - विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता

फ्लाइटच्या किमतीमध्ये इकोनॉमी क्लासच्या तिकिटांवर जीएसटी दर पूर्वीप्रमाणेच ५ टक्के ठेवण्यात आला आहे. ट्रॅव्हल कंपनी विश बोन इंडियाचे मालक ऋषी खंडेलवाल म्हणतात, “यामुळे मध्यमवर्गीय प्रवाशांना दिलासा मिळेल. त्यांना ३ किंवा ४ स्टार हॉटेल्स बुक करताना कमी पैसे खर्च करावे लागतील.” तसेच, मेक माय ट्रिपचे को-फाउंडर आणि ग्रुप सीईओ राजेश मग्गो म्हणाले, “हॉटेल रूमवर जीएसटी कमी झाल्याने भारतीय पर्यटकांसाठी फिरणे अधिक सोपे होईल.”

Web Title: GST Rate Cut on Hotels, Restaurants to Boost Festive Season Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.