Lokmat Money > बिझनेस न्यूज > GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

GST Rate Cut: जीएसटी दरात कपात झाल्यामुळे आता कपड्यांच्या आणि चपलांच्या दुकानांमध्ये ५०% किंवा ८०% अशा मोठ्या सवलती येत्या काळात कमी प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊ काय आहे याचा जीएसटी कपातीशी संबंध.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:24 IST2025-09-20T14:24:00+5:302025-09-20T14:24:30+5:30

GST Rate Cut: जीएसटी दरात कपात झाल्यामुळे आता कपड्यांच्या आणि चपलांच्या दुकानांमध्ये ५०% किंवा ८०% अशा मोठ्या सवलती येत्या काळात कमी प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊ काय आहे याचा जीएसटी कपातीशी संबंध.

GST Rate Cut 50 percent discount 80 percent discount Such offers will no longer be seen on clothing and shoe stores What is the connection with the GST cut | GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

GST Rate Cut: जीएसटी दरात कपात झाल्यामुळे आता कपड्यांच्या आणि चपलांच्या दुकानांमध्ये ५०% किंवा ८०% अशा मोठ्या सवलती येत्या काळात कमी प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे. जीएसटी दरांमधील अलीकडील बदलांचा थेट परिणाम किरकोळ विक्रेत्यांच्या धोरणांवर झालाय, ज्यामुळे ते स्वतःहून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलती कमी करू शकतात.

नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कपडे आणि पादत्राणांवरील जीएसटी दर १२% वरून ५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल विशेषतः अशा वस्तूंसाठी महत्त्वाचा आहे ज्यांची किंमत २,५०० रुपयांपर्यंत आहे. यापूर्वी, १,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर आणि पादत्राणांवर १२% जीएसटी लागत होता, पण आता ही मर्यादा वाढवून २,५०० रुपयांपर्यंतच्या वस्तूंसाठी करण्यात आलीये. यामुळे, सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होतील.

भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?

कंपन्या सूट देणार नाहीत...

या निर्णयामुळे, ब्रँड्स आणि किरकोळ विक्रेत्यांना आता त्यांच्या मार्जिनमधून मोठ्या प्रमाणात सूट देण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत, ग्राहक आकर्षित करण्यासाठी आणि बाजारात टिकून राहण्यासाठी त्यांना मोठी सूट द्यावी लागत होती, ज्यामुळे त्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम होत होता. परंतु, आता सरकारनंच जीएसटी दर कमी केल्यामुळे वस्तूंची मूळ किंमत कमी होईल आणि त्यामुळे ब्रँड्सना स्वतःहून दिली जाणारी सूट कमी करू शकतात. या बदलामुळे, ग्राहक आणि ब्रँड्स या दोघांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना वस्तू स्वस्त मिळतील, तर कंपन्यांचा नफा वाढेल आणि त्यांच्यावर मोठा स्टॉक कमी करण्याचा दबाव कमी होईल, असं काही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

आता बंपर डिस्काऊंट नाही, तर...

वुडलँड आणि लाईफस्टाईल इंटरनॅशनल सारख्या मोठ्या ब्रँड्सच्या अधिकाऱ्यांनीही या गोष्टीची पुष्टी केली आहे की जीएसटीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल, पण त्याच प्रमाणात त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमध्ये कपात होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, जीएसटी कमी झाल्यामुळे वस्तूंची किंमत कमी होईल आणि विक्री वाढेल, ज्यामुळे त्यांचा नफा कायम राहील. हा बदल अशा ब्रँड्ससाठी फायदेशीर आहे, ज्यांची विक्री २,५०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये जास्त होते. एकूणच, जीएसटी दरातील या कपातीमुळे कपडे आणि पादत्राणांच्या बाजारात एक नवा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता आहे, जिथे 'बंपर डिस्काउंट' ऐवजी 'कमी किंमत' हे मुख्य आकर्षण असेल.

 

Web Title: GST Rate Cut 50 percent discount 80 percent discount Such offers will no longer be seen on clothing and shoe stores What is the connection with the GST cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.