जीएसटीमधील १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब संपविण्यात आला असून आता सर्व वस्तू या ५ टक्के आणि १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. या नव्या जीएसटी रचनेची आज घोषणा करण्यात आली असून येत्या २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी रचना लागू होणार आहे.
आज जीएसटी परिषदेची बैठक सुरु होती. पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. आलिशान गाड्या, साखरेचे पेये, फास्ट फूड महागणार आहेत. काही वस्तूंवरील कर हा १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तसेच लक्झरी वस्तूंसाठी ४० टक्के कर लागणार आहे. पान मसाला, गुटखा, दारू इत्यादी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागणार आहे.
वैयक्तिक विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे विमा खरेदी आता स्वस्त झाली आहे. सिमेंटवरील जीएसटी देखील २८% वरून १८% पर्यंत कमी झाला आहे, यामुळे लोकांचे घरांचे स्वप्न स्वस्त झाले आहे. अनेक औषधांवरील जीएसटी शून्यावर आणण्यात आला आहे. छोट्या कार आणि मोटारसायकली (३५० सीसी), टीव्ही आदी गोष्टी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आल्या आहेत.
The GST Council has approved the rationalisation of GST rates. The Council has approved the abolition of 12 per cent and 28 per cent rates. Council approved a new Slab of 40 per cent for Sin and luxury Goods. The decision of the GST Council will come into effect from September… pic.twitter.com/Xty4SVtU5Q
— ANI (@ANI) September 3, 2025
पिझ्झा,ब्रेड, दूध आणि चीजवर जीएसटी लागणार नाही. २५०० रुपयांपर्यंतच्या शूज आणि कपड्यांवरील जीएसटी दर ५% टक्के करण्यात आला आहे. शाम्पू, साबण, तेल आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या इतर घरगुती वस्तूंव्यतिरिक्त, नमकीन, पास्ता, कॉफी, नूडल्सवर आता 5% GST आकारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. 33 जीवनरक्षक औषधे GST च्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहेत. यामध्ये तीन कर्करोगाच्या औषधांचाही समावेश आहे.
Hon’ble Prime Minister Shri @narendramodi announced the Next-Generation GST Reforms in his Independence Day address from the ramparts of Red Fort.
Working on the same principle, the GST Council has approved significant reforms today.
These reforms have a multi-sectoral and… pic.twitter.com/NzvvVScKCF
काय काय स्वस्त झाले...
दूध (UHT), चेन्ना, पनीर (प्री-पॅकेज्ड आणि लेबल केलेले) वर कोणताही कर राहणार नाही.
रोटी, चपाती, पराठा आणि पिझ्झा ब्रेड यांनाही GST मधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
बटर, तूप, बटर ऑइल, चीज, कंडेन्स्ड मिल्क, कोको पावडर, चॉकलेट, आटा-मैदा, पास्ता, नूडल्स, केक, बिस्किटे, आईस्क्रीम इत्यादींपासून बनवलेले तयार अन्नपदार्थांवरील कर १८% किंवा १२% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
खजूर, अंजीर, आंबा, संत्री, लिंबू यासारख्या सुक्या मेव्यांवरील GST १२% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
बदाम, पिस्ता, हेझलनट, पाइन नट्स इत्यादी सुक्या मेव्यांवरील फक्त ५% GST आकारण्यात येईल.
साखर, गूळ, साखरेच्या पाकावरील कर १२% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
मिठाई, नमकीन, जाम, जेली, लोणचे, सॉस, आईस्क्रीम यासारख्या वस्तूंवर फक्त ५% GST आकारण्यात येईल.
५ वरून ० पर्यंत वाढणारे अन्नपदार्थ: UHT दूध, छेना आणि पनीर, सर्व भारतीय ब्रेड, रोटी, पराठा, चपाती यावर कर नाही.
१२-१८ वरून ५% पर्यंत वाढणारे अन्नपदार्थ: सॉस, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, तूप, बटर, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी आणि संरक्षित मांस.
मांस, मासे आणि सीफूड, इतर वस्तू
सॉसेज, मांस उत्पादने, फिश कॅविअर, सीफूडवरील जीएसटी १२% वरून ५% पर्यंत कमी.
तेंदूची पाने, कठा आणि इतर हर्बल उत्पादनांवरील कर १८% वरून ५% पर्यंत कमी.
माल्ट, स्टार्च, व्हेजिटेबल थिकनर आणि ग्लिसरॉलवरील जीएसटी देखील ५% पर्यंत कमी.
प्राण्यांच्या चरबी, माशांचे तेल, तूप यासारख्या प्राण्यांच्या तेलांवर आता फक्त ५% कर आकारला जाईल.