नवी दिल्ली : देशात मधुमेह, हृदयरोग आणि किडनीच्या उपचारांसाठी वापरली जाणारी अनेक महत्त्वाची औषधे स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या औषधांच्या किमती कमी करण्यासाठी ट्रेड मार्जिन निश्चित करण्याची तयारी केली आहे. ट्रेड मार्जिन म्हणजे उत्पादकाने जारी केलेली घाऊक किंमत आणि ग्राहकाला दिलेली कमाल किरकोळ किंमत यामधील फरक. औषध किंमत वॉचडॉग नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेवर काम करत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने एका न्यूज वेबसाइटला यासंदर्भात माहिती दिली आहे.
ट्रेड मार्जिन टप्प्याटप्प्याने तर्कसंगत केले जाईल आणि फार्मास्युटिकल उद्योगाला संपूर्ण प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी वेळ दिला जाईल. जेणेकरून औषध उद्योग आवश्यक बदल करू शकेल. सुत्राने सांगितले की, सरकारने आधीच अँटी-कॅन्सर श्रेणीतील औषधांचे मार्जिन कमी केले आहे. त्याचप्रमाणे यावेळी मधुमेहविरोधी आणि किडनी रोगांशी संबंधित औषधांचे मार्जिन कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, 2018-19 मध्ये, NPPA ने 42 नॉन-शेड्यूल्ड अँटी-कॅन्सर औषधांवरील ट्रेड मार्जिन कमी केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत सांगितले होते की, सरकारच्या या निर्णयामुळे या औषधांच्या 526 ब्रँड्सची MRP 90 टक्क्यांनी कमी झाली आहे.
ट्रेड मार्जिन किंमतीसह वाढते
अभ्यासात असे दिसून आले आहे की, एका गोळीच्या किमतीने ट्रेड मार्जिन वाढते. जर बहुतेक ब्रँड्सच्या एका गोळीची किंमत 2 रुपये असेल, तर त्यावर मार्जिन 50 टक्के आहे. दुसरीकडे, जर त्याची किंमत 15 ते 25 रुपये असेल, तर मार्जिन 40 टक्क्यांपेक्षा कमी राहते. 50 ते 100 रुपयांच्या गोळ्यांच्या श्रेणीतील औषधाच्या ट्रेड मार्जिनच्या किमान 2.97 टक्के औषधांमध्ये ट्रेड मार्जिन 50 ते 100 टक्के, 1.25 टक्के या औषधांमध्ये ट्रेड मार्जिन 100 ते 200 टक्के आणि 2.41 अशा औषधांचे ट्रेड मार्जिन 200 ते 500 टक्के आहे. एनपीपीनुसार, जर टॅब्लेटची किंमत 100 रुपयांच्या वर असेल तर ती महाग श्रेणीमध्ये ठेवली जाते. अशा गोळ्यांपैकी 8 टक्के गोळ्यांवर मार्जिन 200 ते 500 टक्के, 2.7 टक्के औषधांवर 500 ते 1,000 टक्के आणि 1.48 टक्के गोळ्यांवर ट्रेड मार्जिन 1,000 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
