Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

वित्त वर्ष २०२४-२५ साठी वैयक्तिक आयकर प्राप्तीचे उद्दिष्ट १२.५७ लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:08 IST2025-06-26T10:03:05+5:302025-06-26T10:08:19+5:30

वित्त वर्ष २०२४-२५ साठी वैयक्तिक आयकर प्राप्तीचे उद्दिष्ट १२.५७ लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते.

Government's 'tax' revenue falls; target not achieved | सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये वैयक्तिक आयकर प्राप्ती (पर्सनल इनकम टॅक्स रिसिप्ट्स) घसरून १२.३५ लाख कोटी रुपये राहिली असून या वर्षाचे उद्दिष्ट गाठण्यातही अपयश आले आहे, असे लेखा महानियंत्रकांनी (सीजीए) जारी केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

वित्त वर्ष २०२४-२५ साठी वैयक्तिक आयकर प्राप्तीचे उद्दिष्ट १२.५७ लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ते १२.३५ लाख कोटी रुपयेच राहिले. हा आकडा उद्दिष्टापेक्षा २१,८३० कोटी रुपयांनी (जवळपास १.७५ टक्के) कमी आहे.

वृद्धीदर चिंताजनक

वर्ष २०२४-२५ मध्ये आयकर प्राप्तीतील वृद्धी घसरून १७.०२ टक्के झाली आहे. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये ती २५.०८ टक्के होती.

वास्तविक वर्ष २०२४-२५ पहिल्या तिमाहीत ही वृद्धी ५० टक्के होती. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत ती घसरून ६.६१ टक्के, १६.८१ टक्के आणि ६.०८ टक्के झाली. चौथ्या तिमाहीतील वृद्धीदर चिंताजनक असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Government's 'tax' revenue falls; target not achieved