Lokmat Money > बिझनेस न्यूज > PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा

PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा

minimum pension : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सरकार आता किमान पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 10:16 IST2025-04-30T10:04:25+5:302025-04-30T10:16:44+5:30

minimum pension : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सरकार आता किमान पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे.

government can increase minimum pension under eps by 3 times | PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा

PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा

minimum pension : तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि तुमच्या नावावर पीएफ जमा होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (EPS) किमान पेन्शन १,००० रुपयांवरून ३,००० रुपये करण्याची तयारी करत आहे. ही वाढ पुढील काही महिन्यांत लागू केली जाऊ शकते, असं सरकारी सुत्रांनी सांगितलं आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही किमान पेन्शनची रक्कम दरमहा ३,००० रुपये वाढवणार आहोत. २०१४ मध्ये, केंद्र सरकारने ईपीएफओ सदस्यांना देण्यात येणारी किमान पेन्शन २५० रुपयांवरून १००० रुपये प्रति महिना वाढवली होती.

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या १२% रक्कम ईपीएफ खात्यासाठी कापली जाते. त्याचवेळी, तेवढेच योगदान कंपनी देखील कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा करते. नियोक्त्याने जमा केलेल्या पैशांपैकी ८.३३ टक्के रक्कम ईपीएस (कर्मचारी पेन्शन योजना) मध्ये जाते, तर उर्वरित ३.६७ टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते. ईपीएसमध्ये जाणारे पैसे निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळतात. २०२० मध्ये, कामगार मंत्रालयाने ईपीएस अंतर्गत किमान पेन्शन दरमहा २००० रुपये वाढवण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता. पण, त्याला मंजुरी मिळाली नव्हती.

वाचा - EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

किमान पेन्शन ७,५०० पर्यंत वाढवण्याची मागणी
अलिकडेच, एका संसदीय समितीने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी किमान पेन्शन १,००० रुपयांवरून ७,५०० रुपये करण्याची शिफारस केली होती. किमान पेन्शन दरमहा किमान ७,५०० रुपये करावी, अशी कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. ते म्हणतात की महागाई खूप वाढली आहे, म्हणून पेन्शन देखील वाढली पाहिजे. पण गेल्या ११ वर्षांपासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.

Web Title: government can increase minimum pension under eps by 3 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.