Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 25 June: इराण-इस्रायलमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार पुन्हा तेजी दिसू लागताच, सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरू लागल्यात.

By जयदीप दाभोळकर | Updated: June 25, 2025 15:53 IST2025-06-25T15:46:38+5:302025-06-25T15:53:47+5:30

Gold Silver Price 25 June: इराण-इस्रायलमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार पुन्हा तेजी दिसू लागताच, सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरू लागल्यात.

Gold Silver Price 25 June fall again Impact of Iran Israel ceasefire what are the new rates | Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 25 June: इराण-इस्रायलमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार पुन्हा तेजी दिसू लागताच, सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरू लागल्यात. आज, म्हणजेच बुधवार, २५ जून रोजी, २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ११२ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९७१५१ रुपयांवर उघडले. तर, चांदी ३१७ रुपयांनी घसरून १०५६५० रुपये प्रति किलो झाली आहे. तर २४ कॅरेट सोनं जीएसटीसह १०००६५ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकले जात आहे, तर चांदी १०८८१९ रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.

चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन

२२ कॅरेटचा भाव काय?

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंदेखील ११२ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९६७६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत १०३ रुपयांनी कमी होऊन ८९९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. १८ कॅरेट सोन्याची किंमत देखील ८४ रुपयांनी स्वस्त झाली आणि ती ७२८६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आली आहे. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ६६ रुपयांनी कमी होऊन ५६८३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आली आहे. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीचे स्पॉट रेट जाहीर केलेत. यावर GST लागू नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

Web Title: Gold Silver Price 25 June fall again Impact of Iran Israel ceasefire what are the new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.