Gold Silver Price 11 August: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव १०१४०६ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरून आज १००२०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तर, जीएसटीमुळे, सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं १०३२०७ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकले जात आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७४१ रुपयांनी स्वस्त झालाय.
चांदीच्या दरात प्रति किलो ४२४ रुपयांची घसरण झाली. चांदी आता ११४३०८ रुपये प्रति किलोनं विकली जात आहे. जीएसटीसह चांदीची किंमत ११७७३७ रुपये प्रति किलो झाली आहे. शुक्रवारी, जीएसटीशिवाय चांदी ११४७३२ रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर, सोनं १००९४२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं.
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर काय?
आज २३ कॅरेट सोनंदेखील ७३८ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९९८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता १०२७९४ रुपये आहे. त्यात मेकिंग चार्ज समाविष्ट नाही. २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७९ रुपयांनी कमी होऊन ९१७८४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. जीएसटीसह ती ९४५३७ रुपये झाली. तर दुसरीकडे आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ५५६ रुपयांनी स्वस्त झाला आणि तो ७५१५१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला आणि जीएसटीसह तो ७७४०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. त्याच वेळी, १४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ६०३७६ रुपयांवर पोहोचला.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता हे दर जाहीर केले जातात.