Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज सोनं आणखी स्वस्त झालं आहे. सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹२,००० नी कमी झालाय. तर, चांदीबद्दल बोलायचं झाल्यास, ती कालच्या तुलनेत ₹१,६३१ नी स्वस्त झाली. दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे.
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर काय आहे?
ibjarates च्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर प्रति १० ग्रॅम ₹१,१९,१६४ झालाय. यापूर्वी सोमवारी संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१,२१,०७७ होता. म्हणजेच, कालच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ₹१,९१३ ची घसरण झाली आहे. तर, चांदीचा भाव काल संध्याकाळी प्रति किलो ₹१,४५,०३१ होता, जो आज घसरून प्रति किलो ₹१,४३,४०० झाला आहे.
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
२३ कॅरेट सोनं काल संध्याकाळी प्रति १० ग्रॅम ₹१,२०,५९३ दरानं विकलं जात होतं, जे आज प्रति १० ग्रॅम ₹१,१८,६८७ वर आलंय. म्हणजेच, २३ कॅरेट सोन्याच्या दरात ₹१,९०६ ची घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,०९,१५४ आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹८९,३७३ वर पोहोचलाय.
उच्चांकी दरावरून सोनं घसरलं
या महिन्याच्या मध्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. ibjarates नुसार, १७ ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,३०,८७४ झाला होता. तर, १४ ऑक्टोबरला चांदीचा दर प्रति किलो ₹१,७८,१०० झाला होता. परंतु, त्यानंतर दरात घसरण पाहायला मिळत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
