Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याच्या भावात आणखी घसरण

सोन्याच्या भावात आणखी घसरण

सोन्याचा भाव आणखी २५ रुपयांनी घसरून २७,२२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीने स्थानिक सराफ्यात या मौल्यवान धातूची मागणी घटली

By admin | Updated: December 20, 2014 00:42 IST2014-12-20T00:42:56+5:302014-12-20T00:42:56+5:30

सोन्याचा भाव आणखी २५ रुपयांनी घसरून २७,२२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीने स्थानिक सराफ्यात या मौल्यवान धातूची मागणी घटली

Gold prices fall further | सोन्याच्या भावात आणखी घसरण

सोन्याच्या भावात आणखी घसरण

नवी दिल्ली : सोन्याचा भाव आणखी २५ रुपयांनी घसरून २७,२२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीने स्थानिक सराफ्यात या मौल्यवान धातूची मागणी घटली. औद्योगिक संस्था व नाणेनिर्मात्यांकडून योग्य मागणी न मिळाल्याने चांदीचा भावही १०० रुपयांनी कमी होऊन ३६,६०० रुपये प्रतिकिलोवर आला.
बाजार जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात घसरणीचा कल आहे. परिणाम सध्याच्या पातळीवरून आभूषण निर्माते व रिटेलर्सची मागणी घटल्याने सोन्याच्या भावात ही घसरण नोंदली गेली आहे.
लंडन बाजारात सोन्याचा भाव ०.१६ टक्क्यांनी घटून ११९६.०० डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
तयार चांदीचा भाव १०० रुपयांनी घटून ३६,६०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १९० रुपयांनी कमी होऊन ३६,६१० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही १,००० रुपयांनी कमी होऊन खरेदीसाठी ६०,००० रुपये व विक्रीकरिता ६१,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold prices fall further