Gold Silver Price 25 August: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. आज जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोनं ९८७ रुपयांनी वाढून १००३४७ रुपयांवर पोहोचलेत. तर, चांदीचा दर एकाच दिवसात २६२७ रुपयांनी वाढला आहे. आता जीएसटीशिवाय चांदी ११६५३३ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. जीएसटीसह, सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं १०३३५५ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकलं जात आहे. तर, जीएसटीसह चांदीची किंमत १२००२८ रुपये प्रति किलो झाली आहे.
आयबीजेएनुसार, शुक्रवारी जीएसटीशिवाय चांदीचा दर प्रति किलो ११३९०६ रुपये झाला. तर सोनं ९९३५८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं. आता २४ कॅरेट सोने ८ ऑगस्ट रोजीच्या १०१४०६ रुपयांच्या सर्वोच्च पातळीपेक्षा फक्त १०६१ रुपयांनी स्वस्त आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
काय आहे १४ ते २३ कॅरेटचा भाव
आज २३ कॅरेट सोन्याचा भावही ९८३ रुपयांनी वाढून ९८९६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह त्याची किंमत आता १०२९४१ रुपये झाली आहे. त्यात मेकिंग चार्ज जोडण्यात आलेला नाही. २२ कॅरेट सोन्याची किंमत ९०४ रुपयांनी वाढून ९१०१२ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. जीएसटीसह ती ९४६७३ रुपये झाली आहे. आज १८ कॅरेट सोन्याची किंमत ७४० रुपयांनी वाढून ७४५१९ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे आणि जीएसटीसह ती ७७५१६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. त्याच वेळी, १४ कॅरेट सोन्याची किंमत आता जीएसटीसह ६०४६३ रुपयांवर पोहोचली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सोनं आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.