lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंधनाच्या किमती ७२ दिवसांपासून स्थिर

इंधनाच्या किमती ७२ दिवसांपासून स्थिर

४ नोव्हेंबरपासून या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेले ७२ दिवस देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:53 AM2022-01-17T05:53:49+5:302022-01-17T05:54:19+5:30

४ नोव्हेंबरपासून या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेले ७२ दिवस देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत.

Fuel prices stable for 72 days | इंधनाच्या किमती ७२ दिवसांपासून स्थिर

इंधनाच्या किमती ७२ दिवसांपासून स्थिर

नवी दिल्ली : गेल्या ७२ दिवसांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, विमानाच्या इंधनाचे दर ४.२ टक्क्यांनी वाढले आहेत. दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला विमानाच्या इंधन दरामध्ये बदल केला जातो. तसा बदल करण्यात आला 
आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा दररोज आढावा घेतला जात असतो. मात्र, ४ नोव्हेंबरपासून या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेले ७२ दिवस देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत.

४ नोव्हेंबरला सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे पाच आणि १० रुपयांनी घटविले होते. ५ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ८२.७४ डॉलर प्रतिबॅरल होते. त्यानंतर ते १ डिसेंबरला बॅरलला ६८.८७ डॉलरपर्यंत खाली आले होते. त्यानंतर दर वाढले असून, आता ते ८५ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, या काळात दरांमध्ये कोणतेच बदल का झाले नाहीत, याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

Web Title: Fuel prices stable for 72 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.