क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचा पाऊस पाडणारा विराट कोहली 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने या आर्थिक वर्षात एमएस धोनी, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या पेक्षाही अधिक टॅक्स भरला आहे. कोहलीने 2023-24 या आर्थिक वर्षात 66 कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे. क्रिकेटशिवाय त्याच्या उत्पन्नाचे इतरही अनेक स्त्रोत आहेत.
फिल्म इंडस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान हा थलपथी विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा अधिक टॅक्स भरणारा कलाकार ठरला आहे. सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे.
फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार, या लिस्टमध्ये विराट कोहलीनंतर, एमएस धोनी, सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली आणि हार्दिक पांड्या हे टॉप-5 खेळाडू आहेत. महत्वाचे म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत नाही.
विराट कोहलीनंतर एमएस धोनीने 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 38 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. तर सचिन तेंडुलकरने 28 कोटी, सौरव गांगुलीने 23 कोटी आणि हार्दिक पांड्याने 13 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. या यादीत ऋषभ पंत 10 कोटीसह सहाव्या क्रमांकावर आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींसंदर्भात बोलायचे झाल्यास, शाहरुख खान 92 कोटी रुपयांसह यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर, दाक्षिणात्य अभिनेता थलपथी विजय 80 कोटींसह दुसऱ्या स्थानावर आहे, यानंतर, सलमान खान 75 कोटी रुपयांसह तिसऱ्या, तर अमिताभ बच्चन 71 कोटींच्या करासह चौथ्या स्थानावर आहेत.
हे आहेत सर्वाधिक टॅक्स भरणारे भारतीय सेलिब्रिटी-
शाहरुख खान - 92 कोटी रुपये
थलपथी विजय – 80 कोटी रुपये
सलमान खान – 75 कोटी रुपये
अमिताभ बच्चन – 71 कोटी रुपये
विराट कोहली – 66 कोटी रुपये
अजय देवगण – 42 कोटी रुपये
एमएस धोनी - 38 कोटी रुपये
सचिन तेंडुलकर – 28 कोटी रुपये
हृतिक रोशन – 28 कोटी रुपये
कपिल शर्मा - 26 कोटी रुपये
सौरव गांगुली – 23 कोटी रुपये
करीना कपूर - 20 कोटी रुपये
शाहिद कपूर - 14 कोटी रुपये
मोहनलाल - 14 कोटी रु
अल्लू अर्जुन – 14 कोटी रुपये
हार्दिक पांड्या – 13 कोटी रुपये
कियारा अडवाणी - 12 कोटी रुपये
कतरिना कैफ - 11 कोटी रुपये
पंकज त्रिपाठी – 11 कोटी रु
आमिर खान - 10 कोटी रुपये
ऋषभ पंत – 10 कोटी रुपये