प्रसाद गो. जोशी
सातत्याने वर-खाली होणाऱ्या बाजारावर अखेर तेजीवाल्यांची पकड बसलेली दिसली आणि सप्ताहामध्ये प्रमुख निर्देशांक सुमारे १३ टक्क्यांनी वाढले. परकीय वित्तसंस्थांनी केलेली चांगली खरेदी बाजारामध्ये तेजी परत आणण्याला कारण ठरली आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने सप्ताहाचा प्रारंभ वाढीने केला असला तरी कधी कोरोना रुग्णांची वाढती संख्या तर कधी खनिज तेलाचे दर यामुळे बाजार वर-खाली होताना दिसून आला. बाजारामध्ये परकीय वित्तसंस्थांनी केलेली मोठी खरेदी ही तेजीला परत आणण्याला कारणीभूत ठरली आहे. या सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी चांगली खरेदी केली आहे. एप्रिल महिन्यात या संस्थांनी १३४५.०४ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
च्देशांतर्गत वित्तसंस्थांनी एप्रिल महिन्यामध्ये २०२५.११ कोटी रुपयांची विक्री केली आहे. मार्च महिन्यामध्ये या संस्थांनी मोठी खरेदी केली होती. त्यामुळे त्यांनी आता वाढलेल्या बाजारात नफा कमविण्याची संधी साधलेली दिसत आहे.
च्बाजाराला सोमवारी महावीर जयंती तर शुक्रवारी गुडफ्रायडेनिमित्त सुटी होती. त्यामुळे या सप्ताहात बाजारात तीनच दिवस व्यवहार झाले. त्यामध्ये दोन दिवस बाजार वाढला, तर एक दिवस तो खाली आला होता. सप्ताहामध्ये गुंतवणूकदारांची मालमत्ता १२.४ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. आगामी काळात तिमाही निकालांवर बाजाराची वाटचाल अवलंबून आहे.
दृष्टिक्षेपात सप्ताह
निर्देशांक
सेन्सेक्स
निफ्टी
मिडकॅप
स्मॉलकॅप
बंद मूल्य
३१,१५९.६२
९१११.९०
११,३७४.३५
१०,२९३.७५
बदल
+३५६८.६७
+१०२८.१०
+११५५.३० +८८४.७१