Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी

Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी

आता फ्लिपकार्टला त्याच्या प्लॅटफॉर्मद्वारे थेट कर्ज देता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:08 IST2025-06-05T19:06:43+5:302025-06-05T19:08:07+5:30

आता फ्लिपकार्टला त्याच्या प्लॅटफॉर्मद्वारे थेट कर्ज देता येणार आहे.

Flipkart's can give loans directly to customers; RBI gives permission | Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी

Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी

Flipkart : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टला नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) परवाना दिला आहे. यामुळे आता फ्लिपकार्ट त्याच्या प्लॅटफॉर्मद्वारे थेट कर्ज देता येणार आहे. NBFC परवाना मिळणे ही फ्लिपकार्टसाठी मोठी उपलब्धी आहे. यामुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वासही वाढण्यास मदत होईल.

फ्लिपकार्टसाठी मोठी उपलब्धी
फ्लिपकार्ट आधीच तिच्या प्लॅटफॉर्मवर 'बाय नाऊ, पे लेटर' (BNPL) आणि थरेड पार्टी वित्तीय संस्थांद्वारे EMI सारख्या सुविधा देते. आता NBFC परवान्यासह कंपनी कोणत्याही थर्ड पार्टी संस्थेवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे कर्ज देण्याची सुविधा सुरू करू शकते. यामुळे फ्लिपकार्टला Amazon सारख्या स्पर्धकांच्या विरोधात आणखी बळकटी मिळेल. अॅमेझॉनने यापूर्वीच भारतात वित्तीय सेवांमध्ये प्रवेश केला आहे.

लहान व्यावसायिकांना फायदा 
या परवान्याद्वारे फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना स्वस्त आणि सोपे कर्ज प्रदान करेल, ज्यामुळे खरेदीचा अनुभव आणखी सुधारेल. तसेच, फ्लिपकार्टवर उपस्थित असलेल्या लाखो लघु आणि मध्यम विक्रेत्यांचा व्यवसाय मजबूत होईल. त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज मिळू शकेल. हे पाऊल विशेषतः ग्रामीण आणि शहरांमधील लघु व्यवसायांसाठी फायदेशीर ठरू शकते.

कंपनी डिजिटल कर्जे प्रदान करेल
फ्लिपकार्टने अद्याप त्यांचा कर्ज व्यवसाय कसा राबवेल हे स्पष्ट केलेले नाही, परंतु असे मानले जाते की, कंपनी डिजिटल कर्जे, वैयक्तिक कर्जे आणि विक्रेत्यांसाठी विशेष आर्थिक उत्पादनांवर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय, फ्लिपकार्ट त्यांच्या डेटा आणि तांत्रिक क्षमतांचा वापर करून जोखीम मूल्यांकन आणि कर्ज वितरण अधिक कार्यक्षम बनवू शकते. हे पाऊल भारतातील वेगाने वाढणाऱ्या डिजिटल कर्ज बाजारात फ्लिपकार्टला एक महत्त्वाचे स्थान देऊ शकते.

Web Title: Flipkart's can give loans directly to customers; RBI gives permission