Lokmat Money > बिझनेस न्यूज > गेल्या ३ वर्षांत साडेपाच लाख जणांनी गमावली नोकरी, खर्च कपातीसाठी कंपन्यांनी केली कपात

गेल्या ३ वर्षांत साडेपाच लाख जणांनी गमावली नोकरी, खर्च कपातीसाठी कंपन्यांनी केली कपात

खर्च कपातीसाठी जानेवारीपासून २३,१५४ कर्मचाऱ्यांना कमी केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:39 IST2025-03-22T15:39:56+5:302025-03-22T15:39:56+5:30

खर्च कपातीसाठी जानेवारीपासून २३,१५४ कर्मचाऱ्यांना कमी केलं

Five and a half lakh people lost their jobs in the last 3 years companies made cuts to cut costs | गेल्या ३ वर्षांत साडेपाच लाख जणांनी गमावली नोकरी, खर्च कपातीसाठी कंपन्यांनी केली कपात

गेल्या ३ वर्षांत साडेपाच लाख जणांनी गमावली नोकरी, खर्च कपातीसाठी कंपन्यांनी केली कपात

खर्च कमी करण्याच्या उद्देशाने टेक कंपन्यांनी या वर्षात २३,१५४ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. उत्पन्न घटल्यानं कंपन्यांना खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात करावी लागत आहे. २०२३ मध्ये कंपन्यांनी २,६४,२२ कर्मचाऱ्यांची कपात केली तर २०२२ ते २०२४ या काळात तब्बल ५,८१,९६१ लोकांना हातातील काम गमवावं लागलं. 

कर्मचारी कपातीवर नजर ठेवणाऱ्या ‘लेऑफ्स डॉट एफवायआय’ या संस्थेनुसार, यंदाच्या कपातीची सुरुवात ६ जानेवारीपासून झाली. सुरुवातीला इस्रायलच्या सोलरएज कंपनीनं ४०० जणांना कमी केलं. ओला इलेक्ट्रिकने भारतात १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. मेटाने यंदा आतापर्यंत सर्वाधिक ३,६०० लोकांना नोकरीवरून कमी केलं. 

किती जणांना काढले?
कंपनी     कर्मचारी संख्या 
 
मेटा ३,६००
एचपीई२,५००
एचपी२,०००
वर्क डे१,७५०
ऑटो डेस्क     १,३५०
ओला इलेक्ट्रिक        १,०००
ब्लू ओरिजिन     १,०००
क्रूझ     १,०००
सेल्सफोर्स१,०००


अनेकांवर टांगती तलवार

मार्च महिन्याच्या अखेरीस मॉर्गन स्टॅन्ली सुमारे २,००० कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार खर्च कमी करण्याबरोबरच कंपनी एआय आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करत आहे. अमेझॉननेदेखील यावर्षीच्या सुरुवातीला १४ हजार व्यवस्थापकांना नोकरीतून काढण्याची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीला दरवर्षी २.१ अब्ज डॉलर ते ३.६ अब्ज डॉलरची बचत होईल.

एआयमुळे दबाव वाढला 

एआयमुळे कर्मचाऱ्यांवर अधिक चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, चांगली कामगिरी नसलेल्यांना कामावरून काढले जाईल. 

Web Title: Five and a half lakh people lost their jobs in the last 3 years companies made cuts to cut costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी