Lokmat Money > बिझनेस न्यूज > लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक

लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक

Income Tax Return Filing Date 2025: १५ सप्टेंबर यासाठी शेवटची तारीख आहे. जर आपण अजूनही रिटर्न भरला नसेल, तर लवकरात लवकर भरावा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 09:23 IST2025-09-09T09:20:10+5:302025-09-09T09:23:19+5:30

Income Tax Return Filing Date 2025: १५ सप्टेंबर यासाठी शेवटची तारीख आहे. जर आपण अजूनही रिटर्न भरला नसेल, तर लवकरात लवकर भरावा.

File your income tax return quickly, otherwise...; Only a week left to file your tax return | लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक

लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक

नवी दिल्ली : आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्यासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. लेट फाइलिंग आणि दंड टाळण्यासाठी आयटीआर भरण्यासाठी आता केवळ एक आठवड्याचा अवधी शिल्लक आहे. १५ सप्टेंबर यासाठी शेवटची तारीख आहे. जर आपण अजूनही रिटर्न भरला नसेल, तर लवकरात लवकर भरावा. जर उत्पन्न कायदेशीररीत्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. 

यावेळी नेमके कोणते बदल केले आहेत?

स्टँडर्ड डिडक्शन : नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन ७५ हजार रुपये करण्यात आले आहे. पूर्वी ते ५० हजार करण्यात आले आहे.

८७ अ सवलत : पूर्वी ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर लागू होती; आता ती वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे.

दीर्घकालीन भांडवली नफा  

जर रक्कम १,२५,००० रुपयांपर्यंत असेल, तर तुम्ही त्याबद्दल फॉर्म-१ किंवा फॉर्म-४ मध्ये माहिती देऊ शकता. २३ जुलै २०२४ पूर्वी, नंतरचे भांडवली नफा फॉर्म-२ आणि फॉर्म-३ मध्ये स्वतंत्रपणे नोंदवावे लागतील.

मालमत्ता-दायित्व अहवाल : पूर्वी ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेची माहिती द्यावी लागत होती. आता ही मर्यादा १ कोटी रुपये करण्यात आली आहे.

तारखा विसरू नका

१५ सप्टेंबर - दंडाशिवाय आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख.

३० सप्टेंबर - ज्या व्यवसायांना ट्रान्सफर प्राइसिंग रिपोर्टची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख.

३१ सप्टेंबर - ज्या कंपन्या, फर्म्सचे खाते ऑडिट केले जाते त्यांच्यासाठी अंतिम मुदत. लेट फाईलिंगसह आयटीआर भरण्याची अंतिम तारीख.

वेळेवर आयटीआर न भरण्याचे तोटे?

विलंब शुल्क - जर उत्पन्न ५ लाख रुपयांपर्यंत असेल तर : १००० रुपये. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास : ५,००० रुपये शुल्क लागेल.

व्याज - आयटीआर उशिरा दाखल केल्यास, थकबाकी असलेल्या करावर दरमहा १% व्याज द्यावे लागेल.

कर्ज आणि व्हिसा - वेळेवर रिटर्न भरले नाही तर कर्ज मंजुरी आणि व्हिसा प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.

ही कागदपत्रे आहेत महत्त्वाची 

फॉर्म १६ : यामध्ये पगारदार कर्मचाऱ्यांच्या पगारातून वर्षभरात कापल्या जाणाऱ्या टीडीएसची संपूर्ण माहिती असते. त्याचे दोन भाग अ आणि ब आहेत. भाग अ मध्ये एकूण उत्पन्न आणि त्यावर कापलेल्या टीडीएसची माहिती असते. ही माहिती २६ एएसमध्ये देखील उपलब्ध आहे. भाग ब मध्ये सॅलरी ब्रेकअप, सवलत, वजावट आणि एकूण करपात्र उत्पन्न समाविष्ट आहे.

फॉर्म १६ अ : यामध्ये पगाराव्यतिरिक्त उत्पन्नावरील टीडीएसची माहिती असते. जसे की बँक एफडीवरील व्याजातून कापला जाणारा टीडीएस. बँक किंवा संस्था हा फॉर्म जारी करते.

फॉर्म १६ ब : मालमत्तेबाबतच्या टीडीएसबद्दल माहिती आहे. ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेवर हा लागू आहे.

फॉर्म १६ सी : जर भाडेकरूने दरमहा ५०,००० रुपये किंवा त्याहून अधिक भाड्यावर टीडीएस कापला असेल, तर तो हा फॉर्म घरमालकाला देतो. या फॉर्मसाठी कपात करणाऱ्याशी संपर्क साधा.

फॉर्म २६ एएस : हा फॉर्म आयकर विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यात कापलेला टीडीएस, भरलेला आगाऊ कर, कर परतावा यासह सर्व आर्थिक माहिती आहे. आयटीआर दाखल करण्यापूर्वी २६ एएस पाहणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमच्या उत्पन्नातून कापलेला कर सरकारकडे योग्यरीत्या जमा झाला आहे की नाही याची खात्री करता येईल.

एआयएस : एका व्यक्तीने वर्षभरात नेमके कोणते आर्थिक व्यवहार केले याची माहिती यातून मिळते. यावरून दिसून येते की, आपली किती आर्थिक माहिती सरकारकडे आधीच उपलब्ध आहे. 

Web Title: File your income tax return quickly, otherwise...; Only a week left to file your tax return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.