Festive Hiring 2025: यावर्षी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आलीये. अॅडेको इंडियाच्या अहवालानुसार, २०२५ च्या दुसऱ्या सहामाहीत २.१६ लाखांहून अधिक हंगामी नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १५-२०% आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सणासुदीच्या काळात रिटेल, ई-कॉमर्स, बीएफएसआय, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि एफएमसीजी यासारख्या क्षेत्रात सर्वाधिक भरती दिसून येईल. अहवालानुसार, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी, हंगामी विक्री आणि लग्नाचा हंगाम लक्षात घेता कंपन्यांनी आधीच याला गती दिली आहे.
कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
ग्राहकांच्या चांगल्या भावना, अनुकूल पावसाळ्यामुळे ग्रामीण भागातील मागणीत वाढ, निवडणुकीनंतर आर्थिक आत्मविश्वास वाढणं आणि आक्रमक हंगामी जाहिराती यामुळे नोकरभरतीत वाढ झाली आहे, ज्यामुळे या वर्षी सणासुदीच्या काळात प्रचंड रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं यात नमूद करण्यात आलंय. ज्या महानगरांमध्ये हंगामी नोकऱ्या सर्वाधिक दिसून येतील त्यात दिल्ली-एनसीआर, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि पुणे यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत येथे १९% जास्त नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. टियर-२ शहरांबद्दल बोलायचं झालं तर, लखनौ, जयपूर, कोइम्बतूर, नागपूर, भुवनेश्वर, म्हैसूर आणि वाराणसीमध्ये ४२% पर्यंत वाढ होऊ शकते. याशिवाय कानपूर, कोची आणि विजयवाडा सारख्या शहरांमध्येही मागणी वेगानं वाढत आहे.
पगार आणि भूमिका कोणती असेल?
महानगरांमध्ये १२-१५% पगारवाढ होईल, तर उदयोन्मुख शहरांमध्ये १८-२२% पगारवाढ होऊ शकते. लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरीमध्ये भरती ३०-३५% वाढेल. याव्यतिरिक्त, बीएफएसआय क्षेत्रातील क्रेडिट कार्ड विक्री आणि पीओएस इन्स्टॉलेशनसाठी टियर-२/३ शहरांमध्ये फील्ड फोर्सची मागणी वाढेल. हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हलमध्ये भरती २०-२५% वाढण्याची अपेक्षा आहे. ई-कॉमर्स आणि रिटेल हे रोजगाराचे सर्वात मोठे स्रोत राहतील, ज्यांचा हिस्सा ३५-४०% असेल.