यामुळे तुम्ही कोणता ट्रेंड फॉलो करायचा किंवा स्वत:ची स्टाईल कशी तयार करता येईल, याचा विचार केला पाहिजे. या काही टिप्सनी तुमचा फॅशन सेन्स पूर्णपणे बदलून जाईल.
► तुमच्या साईजनुसार कपडे परिधान करा. तुम्ही वेंधळे दिसू नये असे वाटत असेल, तर खूप टाईट किंवा खूप सैल कपडे घालणे टाळा.
► वाढलेला पोटाचा घेर तुमच्या चिंतेचे कारण बनला असेल, तर पेप्लम्स (कंबरेच्या वर फ्रॉकसारखी शिवण असलेला ड्रेस) परिधान करा.
► तुम्हाला कोणता कलर सूट होतो, हे माहिती करून घ्या. तुमच्या त्वचेच्या रंगांवर कपड्यांचा योग्य रंग अवलंबून असतो, यामुळे तुमचा स्किन अंडरटोन लक्षात घ्या.
► तुमचे फॅशन फंडे गुपीत ठेवा. तसेच कपड्यांचे रंग, त्यानुसार वापरता येणारे दागिने एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा.
► ट्युब टॉप घालणे अतिशय धोकादायक असते आणि तुम्हाला निश्चित तुमचे हसू करून घ्यायचे नसेल. त्यामुळे असे टॉप घालणे शक्यतो टाळा