Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ड्रीम इलेव्हेनसारख्या ऑनलाइन गेमिंगचे चाहते आहात? आता प्राईज मनीवर द्यावा लागेल इतका टॅक्स

ड्रीम इलेव्हेनसारख्या ऑनलाइन गेमिंगचे चाहते आहात? आता प्राईज मनीवर द्यावा लागेल इतका टॅक्स

जर तुम्ही ऑनलाइन गेमिंगचे चाहते असाल आणि त्यातून पैसे मिळवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 06:48 PM2023-02-01T18:48:01+5:302023-02-01T18:49:35+5:30

जर तुम्ही ऑनलाइन गेमिंगचे चाहते असाल आणि त्यातून पैसे मिळवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Fan of online gaming like Dream Eleven Now this much tax has to be paid on the prize money tds union budget 2023 nirmala sitharaman | ड्रीम इलेव्हेनसारख्या ऑनलाइन गेमिंगचे चाहते आहात? आता प्राईज मनीवर द्यावा लागेल इतका टॅक्स

ड्रीम इलेव्हेनसारख्या ऑनलाइन गेमिंगचे चाहते आहात? आता प्राईज मनीवर द्यावा लागेल इतका टॅक्स

2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ऑनलाइन गेमिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएसच्या नियमाबाबतही मोठा बदल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात ऑनलाइन गेमिंगची क्रेझ खूप वाढली आहे. सध्या ऑनलाइन गेमिंगमधून पैसे जिंकणाऱ्या व्यक्तीला 10000 हजारांपेक्षा जास्त रकमेवर 30 टक्के TDS भरावा लागतो, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले आहे की 1 एप्रिल 2023 पासून ऑनलाइन गेमिंगमध्ये जिंकलेल्या कोणत्याही रक्कमेवर आता टीडीएस भरावा लागणार आहे.

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी सरकारकडे टीडीएस कमी करण्याची मागणी केली होती. सध्या ऑनलाइन गेममध्ये जर कोणी 10,000 पेक्षा कमी रक्कम जिंकली तर त्याला TDS भरावा लागत नाही, मात्र नवीन नियमानुसार आता 10,000 पेक्षा कमी जिंकल्यास TDS भरणे बंधनकारक असणार आहे. त्याच वेळी, आयकर रिटर्न (ITR) भरताना इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या अंतर्गत ऑनलाइन गेमिंगमधून जिंकलेल्या रकमेची माहिती देणे आवश्यक असेल.

काय आहे नियम?
सध्या जर एखाद्या व्यक्तीने ऑनलाइन गेमिंगमध्ये 1000 हजार रुपये खर्च केले आणि 35000 जिंकले, तर TDS कापल्यानंतर विजेत्याला केवळ 24500 रुपये मिळतील आणि त्याला 10500 रुपये कर भरावा लागेल. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीने ऑनलाइन गेमिंगमधून 9500 रुपये जिंकले तर त्याला कोणत्याही प्रकारचा टीडीएस भरावा लागणार नाही, परंतु नवीन नियमानंतर आता सर्वांना कर भरावा लागेल.

काय होती कंपन्यांची मागणी?
ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी बजेटमध्ये टीडीएसची टक्केवारी कमी करण्याची मागणी केली होती. ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील कंपन्यांना टीडीएस कपातीत सूट देण्याची आणि गेम डेव्हलपमेंट फंडाची स्थापना करण्याची मागणी अर्थसंकल्पातून करण्यात आली होती. ऑनलाइन गेमिंग क्षेत्र हे भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे.

Web Title: Fan of online gaming like Dream Eleven Now this much tax has to be paid on the prize money tds union budget 2023 nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.