Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑफिसमधील 'साहेबां'पेक्षा कारखान्यातील 'घाम' महागला

ऑफिसमधील 'साहेबां'पेक्षा कारखान्यातील 'घाम' महागला

सर्वात जास्त वेतनाचा विचार केल्यास आयटी क्षेत्र आजही अव्वल स्थानी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:15 IST2026-03-27T12:15:23+5:302026-03-27T12:15:23+5:30

सर्वात जास्त वेतनाचा विचार केल्यास आयटी क्षेत्र आजही अव्वल स्थानी आहे.

factory workers has become more expensive than boss in the office | ऑफिसमधील 'साहेबां'पेक्षा कारखान्यातील 'घाम' महागला

ऑफिसमधील 'साहेबां'पेक्षा कारखान्यातील 'घाम' महागला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बदलत्या अर्थव्यवस्थेत आता पांढरपेशा नोकऱ्यांपेक्षा शारीरिक श्रम आणि तांत्रिक कौशल्य असणाऱ्या कामगारांच्या श्रमाला अधिक किंमत मिळू लागली आहे. कार्यालयातील (ऑफीस) सुरुवातीच्या स्तरावरील नोकऱ्यांच्या तुलनेत कारखाने आणि डिलिव्हरी आणि इतर शारीरिक श्रमाशी निगडीत कामगारांच्या पगारात वेगाने वाढ होत असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे.

डिजिटल जॉब प्लॅटफॉर्म 'वर्कइंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वेतन अहवालानुसार, २०२४च्या तुलनेत २०२५मध्ये कामगारांच्या किमान वेतनात ८.६० टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ऑफीसमधील एन्ट्री लेव्हलच्या नोकऱ्यांमधील वेतनवाढीचा दर यापेक्षा कमी आहे. शारीरिक श्रमाशी संबंधित
कामगारांचे वेतन २०२४मध्ये किमान १४,०५६ रुपये होते, ते २०२५मध्ये वाढून १५,२६५ रुपये झाले. 

याउलट, कार्यालयीन क्षेत्रातील प्रवेश स्तरावरील नोकऱ्यांमध्ये वेतनवाढ तुलनेने मंद राहिली आहे. या गटात वेतन १४,७६० रुपयांवरून १५,७५६ रुपये इतकेच वाढले. डिलिव्हरी, चालक आणि वाहनसंबंधित क्षेत्रांमध्ये वेतनवाढ सर्वाधिक नोंदली गेली असून, ती १६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सर्वात जास्त वेतनाचा विचार केल्यास आयटी क्षेत्र आजही अव्वल स्थानी आहे.

 

Web Title : शारीरिक श्रम की नौकरियां वेतन वृद्धि में आगे: रिपोर्ट

Web Summary : शारीरिक श्रम और तकनीकी कौशल अब कार्यालय की नौकरियों से अधिक मूल्यवान हैं। एक रिपोर्ट में एंट्री-लेवल ऑफिस भूमिकाओं की तुलना में कारखाने और डिलीवरी श्रमिकों के लिए तेजी से वेतन वृद्धि का पता चला है, डिलीवरी में 16% की वृद्धि देखी गई है। आईटी क्षेत्र का वेतन अभी भी सबसे अधिक है।

Web Title : Blue-collar jobs outpace white-collar in wage growth: Report

Web Summary : Physical labor and technical skills are now more valued than office jobs. A report reveals faster wage growth for factory and delivery workers compared to entry-level office roles, with delivery seeing 16% increases. IT sector salaries remain highest overall.

टॅग्स :Salaryपगार