Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अति महत्त्वाची- गंगापूर दुष्काऴ़़़

अति महत्त्वाची- गंगापूर दुष्काऴ़़़

गंगापुरात ८८ गावे टँकरच्या भरवशावर

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:11+5:302016-03-03T01:57:11+5:30

गंगापुरात ८८ गावे टँकरच्या भरवशावर

Extremely important - Gangapur drought | अति महत्त्वाची- गंगापूर दुष्काऴ़़़

अति महत्त्वाची- गंगापूर दुष्काऴ़़़

गापुरात ८८ गावे टँकरच्या भरवशावर
दुष्काळाच्या झळा : रोहयोची कामे नसल्याने मजुरांची उपासमारी, सिंचन विहिरींची कामे ठप्प
लालखाँ पठाण
गंगापूर : तालुक्यात कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकर्‍यांचा आत्महत्या करण्याचा सपाटा सुरूच असून वर्षभरात १५ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली़ एकीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असताना तालुक्यातील तब्बल ८८ गावांतील नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत़ पुढील काळात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ दुसरीकडे रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवात न झाल्यामुळे तालुक्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे़ मात्र तरीही या संदर्भात प्रशासन योग्य पाऊल उचलत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे़
पावसाअभावी तालुक्यातील सिंचन व्यवस्थेसह पिण्याच्या पाण्याचे गणित बिघडले आहे़ याचा परिणाम तालुक्यातील बजारपेठेवर झाला़ विशेष म्हणजे गंगापूर तालुक्याच्या दक्षिणेला सतत पाणी असणारी गोदावरी नदी, पूर्वेला सतत वाहणारी खांब नदी, तर मध्यावर नांदूर मधमेश्वर कालवा. या शिवाय दोन मोठे सिंचन प्रकल्पही तालुक्यात आहेत़ मात्र गोदावरी नदी वगळता बाकीच्या सिंचन व्यवस्थेचा तालुक्याला कुठलाच फायदा आतापर्यंत झालेला दिसत नाही.
नांदूर मधमेश्वर कालव्याच्या चार्‍या-पोटचार्‍यांचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने गंगापूर तालुक्यासाठी येणारे प्रत्येक आवर्तन हे मृगजळ ठरत आहे, तर टेंभापूर प्रकल्प व शिल्लेगाव प्रकल्प अद्याप तालुक्याच्या सिंचनासाठी उपयुक्त ठरले नाही. तालुक्यातील सिंचन व्यवस्थेचा कणाच तुटल्याने शेतात बी बियाणे खते यावर केलेला खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे़
गतवर्षी गंगापूर तालुक्यातील ११६७ शेतकर्‍यांना सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या़ या विहिरी मंजूर करून घेताना प्रत्येक शेतकर्‍यास दुष्काळ परिस्थितीत किमान ३० हजार रुपये खर्च करावा लागला़ मात्र पं़ स़ प्रशासनाने केवळ १७७ सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश दिले आहेत. दरम्यान, शिल्लक विहिरींचे कार्यारंभ आदेश जारी करून ते कामदेखील सुरू करावे,असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदकडून मिळूनही बीडीओंनी सदर कामे सुरू केलीच नाहीत़
जोड आहे़़़़़़़़़़
--------------------

Web Title: Extremely important - Gangapur drought