Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाच पटीने वाढले ईटीएफ, तुम्हीही त्यात गुंतवले का पैसे? म्युच्युअल फंड उद्योगात ईटीएफचा वाटा ७ वरून थेट १३ टक्क्यांवर

पाच पटीने वाढले ईटीएफ, तुम्हीही त्यात गुंतवले का पैसे? म्युच्युअल फंड उद्योगात ईटीएफचा वाटा ७ वरून थेट १३ टक्क्यांवर

देशातील म्युच्युअल फंड उद्योगात २०१४ पासून सातत्याने पैसा येत आहे. गुंतवणुकीचे पर्याय अधिक पारदर्शक, सोपे व्हावेत, यासाठी उद्योगाने अनेक इनोव्हेशन केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:05 IST2025-07-03T08:55:16+5:302025-07-03T09:05:48+5:30

देशातील म्युच्युअल फंड उद्योगात २०१४ पासून सातत्याने पैसा येत आहे. गुंतवणुकीचे पर्याय अधिक पारदर्शक, सोपे व्हावेत, यासाठी उद्योगाने अनेक इनोव्हेशन केले आहेत.

ETFs have increased five times, have you invested in them? ETFs' share in the mutual fund industry has increased from 7 to 13 percent | पाच पटीने वाढले ईटीएफ, तुम्हीही त्यात गुंतवले का पैसे? म्युच्युअल फंड उद्योगात ईटीएफचा वाटा ७ वरून थेट १३ टक्क्यांवर

पाच पटीने वाढले ईटीएफ, तुम्हीही त्यात गुंतवले का पैसे? म्युच्युअल फंड उद्योगात ईटीएफचा वाटा ७ वरून थेट १३ टक्क्यांवर

मुंबई : भारतातील एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) बाजाराला आता वेग आला असून, गेल्या पाच वर्षांत ईटीएफचा व्यवस्थापित निधी पाचपट वाढला आहे. याच काळात किरकोळ गुंतवणूकदारांचे फोलिओ तब्बल ११ पट वाढले आहेत.

देशातील म्युच्युअल फंड उद्योगात २०१४ पासून सातत्याने पैसा येत आहे. गुंतवणुकीचे पर्याय अधिक पारदर्शक, सोपे व्हावेत, यासाठी उद्योगाने अनेक इनोव्हेशन केले आहेत. त्यातूनच ईटीएफसारखा साधा, पण प्रभावी गुंतवणूक पर्याय पुढे आला. हा फंड शेअर बाजारात शेअरसारखा खरेदी-विक्री करता येणारा, पण फंडासारखा व्यवस्थापित असतो.

२०२० मध्ये ईटीएफचा म्युच्युअल फंड क्षेत्रातील हिस्सा ७ टक्के होता, तो आता १३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

ईटीएफच्या ट्रेडिंगमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये केवळ ५१,१०१ कोटी रुपयांचे ट्रेड यात झाले.

२०२४-२५ मध्ये ते थेट ३.८३ लाख कोटींवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, गेल्या फक्त एका वर्षातच ही रक्कम दुप्पट झाली आहे.

आर्थिक वर्ष     व्यवहार मूल्य कोटी रुपये

२०१९-२०       ५१,१०१

२०२०-२१       ६५,६९२

२०२१-२२       ८७,१८८

२०२२-२३       १,१९,६८२

२०२३-२४       १,८३,६७६

२०२४-२५       ३,८२,६४८

संपूर्ण जागतिक ईटीएफ बाजाराच्या तुलनेत भारताचा वाटा अजूनही केवळ २ टक्के इतकाच आहे.

Web Title: ETFs have increased five times, have you invested in them? ETFs' share in the mutual fund industry has increased from 7 to 13 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.