Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा

फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा

EPFO PF withdrawal Rules : ईपीएफओने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. कर्मचारी आता यूपीआयद्वारे त्वरित पैसे काढू शकतील, ज्यामुळे फॉर्म भरण्याचा त्रास कमी होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:01 IST2026-01-11T15:52:11+5:302026-01-11T16:01:14+5:30

EPFO PF withdrawal Rules : ईपीएफओने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. कर्मचारी आता यूपीआयद्वारे त्वरित पैसे काढू शकतील, ज्यामुळे फॉर्म भरण्याचा त्रास कमी होईल.

EPFO UPI Framework 2026 Withdraw PF Funds Instantly via UPI Apps | फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा

फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा

EPFO PF withdrawal with UPI : देशातील कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आतापर्यंत 'पीएफ'चे पैसे काढण्यासाठी भरावे लागणारे फॉर्म आणि दिवसांची प्रतीक्षा आता इतिहासजमा होणार आहे. ईपीएफओने 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' सोबत हातमिळवणी केली असून, आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच 'UPI'च्या माध्यमातून पीएफचे पैसे थेट बँक खात्यात वळते करण्याची सुविधा सुरू केली आहे.

फॉर्म भरण्याची कटकट संपणार
सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने ५ लाख रुपयांपर्यंतच्या 'ऑनलाइन ॲडव्हान्स क्लेम'साठी अर्ज केला, तरीही ते पैसे बँक खात्यात जमा होण्यासाठी किमान ३ कामाचे दिवस लागतात. जर ही रक्कम ५ लाखांहून अधिक असेल, तर हा कालावधी आणखी वाढतो. मात्र, 'यूपीआय फ्रेमवर्क'च्या अंमलबजावणीनंतर, पीएफ क्लेम मंजूर होताच काही सेकंदात पैसे थेट कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा होतील.

सुरुवात 'BHIM' पासून
ईपीएफओच्या या नवीन सुविधेचा वापर सुरुवातीला केवळ सरकारी भीम यूपीआय ॲपद्वारेच करता येईल. मात्र, ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर येत्या काही दिवसांत Paytm, PhonePe आणि Google Pay यांसारख्या लोकप्रिय खाजगी यूपीआय प्लॅटफॉर्मवरही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पैसे काढण्याची मर्यादा किती?

  • या सुविधेचा गैरवापर टाळण्यासाठी आरबीआयच्या यूपीआय नियमांनुसार काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.
  • सध्या (जानेवारी २०२६) यूपीआयची दैनंदिन व्यवहार मर्यादा १ लाख रुपये आहे.
  • वैद्यकीय उपचार, शिक्षण, विमा, ट्रॅव्हल आणि आयपीओ यांसारख्या विशेष कारणांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएफ धारकांना आपत्कालीन वैद्यकीय कारणासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचा क्लेम यूपीआयद्वारे झटपट मिळवता येईल.

वाचा - सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा

नोकरदारांना काय होणार फायदा?

  • आपत्कालीन स्थितीत पैशांसाठी ४-५ दिवस वाट पाहावी लागणार नाही.
  • व्यवहार यूपीआयद्वारे होणार असल्याने त्याची ट्रॅकिंग सोपी होईल.
  • फॉर्म आणि कागदपत्रांच्या कटकटीतून नोकरदारांची पूर्णपणे सुटका होईल.

Web Title : फॉर्म भरने की झंझट खत्म! UPI से PF निकालें, सेकंडों में पैसा

Web Summary : ईपीएफओ ने यूपीआई के माध्यम से पीएफ निकासी शुरू की, जिससे फॉर्म और देरी खत्म हो गई। पैसा सीधे बैंक खाते में सेकंडों में ट्रांसफर होगा। शुरुआत में भीम पर उपलब्ध, फिर पेटीएम, फोनपे और गूगल पे पर मिलेगा। यूपीआई सीमा ₹1 लाख दैनिक, चिकित्सा आपातकाल के लिए ₹5 लाख।

Web Title : No More Forms! Withdraw PF via UPI, Money in Seconds

Web Summary : EPFO enables PF withdrawals via UPI, eliminating forms and delays. Funds transfer directly to bank accounts in seconds. Initially available on BHIM, expanding to Paytm, PhonePe, and Google Pay. UPI limit is ₹1 lakh daily, ₹5 lakh for medical emergencies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.