Lokmat Money > बिझनेस न्यूज > PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

EPFO Pension Hike : जर तुम्हीही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ होण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:35 IST2025-07-29T12:12:44+5:302025-07-29T13:35:12+5:30

EPFO Pension Hike : जर तुम्हीही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ होण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

EPFO Minimum Pension Hike Government Clarifies No Final Decision on ₹7,500 Increase | PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

Pension Hike : तुम्ही जर खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तुमच्याकडे पेन्शन मिळवण्याचा मार्ग म्हणजे पीएफ फंड. सरकार तुमच्या पेन्शनमध्ये वाढ करेल अशी आशा तुम्हाला असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करू शकते. गेल्या काही महिन्यांपासून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत किमान पेन्शन लवकरच १,००० रुपयांवरून ७,५०० रुपये प्रति महिना केले जाऊ शकते, अशा बातम्या सतत येत होत्या. संसदीय समिती आणि अनेक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे ही मागणी वारंवार केली जात होती. मात्र, आता सरकारने यावर संसदेत स्पष्टीकरण दिले आहे.


पेन्शन वाढवण्याचा सध्या कोणताही विचार नाही?
सरकारने संसदेत सांगितले की, पेन्शन वाढीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. सरकारने हे मान्य केले आहे की पेन्शनधारकांकडून किमान पेन्शन वाढवण्याची सतत मागणी केली जात आहे. संसदेत दिलेल्या उत्तरात असे सांगण्यात आले की, २०१४ च्या सुरुवातीला अर्थसंकल्पीय मदतीद्वारे किमान मासिक पेन्शन १,००० करण्यात आले होते आणि सध्या यावर आढावा सुरू आहे. परंतु सध्या ७,५०० रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन देण्याची कोणतीही औपचारिक घोषणा किंवा निर्णय झालेला नाही.


भविष्यातील शक्यता काय आहे?
सरकार सध्या समितीच्या प्रस्तावाचे आणि त्याच्या अर्थसंकल्पीय परिणामाचे मूल्यांकन करत आहे. मंत्रालयाच्या मते, जेव्हा जेव्हा यावर कोणताही ठोस निर्णय घेतला जाईल, तेव्हा संसद आणि जनतेला त्याबद्दल माहिती दिली जाईल. याचा अर्थ असा की, सध्याच्या परिस्थितीत, पेन्शनधारकांना थोडा जास्त वेळ वाट पहावी लागेल आणि सध्या किमान पेन्शन रक्कम अजूनही १,००० रुपये आहे.

वाचा - चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!


पीएफ पेन्शन वाढवण्याबाबत चर्चा अजूनही सुरू आहे. संसदीय पॅनेलच्या शिफारशी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोरदार आहेत, परंतु सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे की सध्या रक्कम वाढवण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की यावर विचार केला जात आहे, पण पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: EPFO Minimum Pension Hike Government Clarifies No Final Decision on ₹7,500 Increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.