Lokmat Money > बिझनेस न्यूज > ईपीएफओ सदस्यसंख्येत दुपटीहून अधिक वाढ; रोजगारात बूस्टर

ईपीएफओ सदस्यसंख्येत दुपटीहून अधिक वाढ; रोजगारात बूस्टर

तरुण अन् महिलांना मिळतेय अधिक संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:26 IST2025-09-09T16:26:41+5:302025-09-09T16:26:41+5:30

तरुण अन् महिलांना मिळतेय अधिक संधी

EPFO membership more than doubles Booster in employment know details | ईपीएफओ सदस्यसंख्येत दुपटीहून अधिक वाढ; रोजगारात बूस्टर

ईपीएफओ सदस्यसंख्येत दुपटीहून अधिक वाढ; रोजगारात बूस्टर

देशातील असंघटित कामगारवर्ग हळूहळू संघटित क्षेत्रात प्रवेश करत असून यात तरुण आणि महिलांची मोठी भर पडत आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेत (ईपीएफओ) २०२४-२५ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक नवे सदस्य सामील झाले आहेत. ही वाढ प्रामुख्याने तरुणांच्या सहभागामुळे झाली.
मागील आर्थिक वर्षात १.३९ कोटी नवे सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाले, जे २०१८-१९ मधील ६१ लाखांच्या तुलनेत दुप्पटपेक्षा अधिक आहे. 

सर्वाधिक रोजगार कुठे? 

बँकिंग-फायनान्स, विमा, रिटेल, उत्पादन आणि दूरसंचार या क्षेत्रांनी रोजगारनिर्मितीत आघाडी घेतली आहे. मागील चार वर्षांत उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या वार्षिक ३२ टक्क्यांनी वाढल्या, हा सर्वांत वेगवान दर ठरला. वेतनाच्या बाबतीत बँकिंग-फायनान्स, विमा क्षेत्रात सरासरी मासिक पगार २८,५०० रुपये, तर रिटेलमध्ये २३,००० रुपये आहे.

 

Web Title: EPFO membership more than doubles Booster in employment know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :EPFOईपीएफओ