Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ; पण EPFO अधिकाऱ्यांना सतावतेय वेगळीच चिंता

पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ; पण EPFO अधिकाऱ्यांना सतावतेय वेगळीच चिंता

EPFO new Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) घेतलेल्या एका निर्णयामुळे अधिकारी चिंतेत आहेत. पीएफ योजनेचा मूळ हेतू यामुळे साध्य होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 10:35 IST2025-03-19T10:35:03+5:302025-03-19T10:35:35+5:30

EPFO new Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) घेतलेल्या एका निर्णयामुळे अधिकारी चिंतेत आहेत. पीएफ योजनेचा मूळ हेतू यामुळे साध्य होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

epfo concern how to curb pf withdrawals by young people how to secure retirement funds despite 8 25 interest rate | पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ; पण EPFO अधिकाऱ्यांना सतावतेय वेगळीच चिंता

पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ; पण EPFO अधिकाऱ्यांना सतावतेय वेगळीच चिंता

EPFO new Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) देशातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. ही योजना कर्मचाऱ्यांना अनेक फायदे देते, ज्यामुळे निवृत्तीनंतर त्यांचे भविष्य सुरक्षित होते. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक निवृत्तीवेतन देते. अलीकडेच संघटनेने पीएफचे पैसे काढण्यासाठी सुलभ प्रक्रिया आणण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता तुम्ही एटीएम मशीनमधूनही पीएफचे पैसे केव्हाही काढू शकता. मात्र, याच निर्णयामुळे आता संघटनेचे अधिकारी चिंतेत आहेत.

सध्या EPF मध्ये ठेवींवर ८.२५% व्याज दिले जात आहे. नोकरी बदलताना कर्मचाऱ्यांनी पीएफचे पैसे काढू नयेत अशी अधिकाऱ्यांची इच्छा आहे. निवृत्तीनंतर पीएफचे पैसे खूप उपयोगी पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय घर बांधणे किंवा मुलांचे लग्न अशा कामांसाठीही त्याचा उपयोग होईल. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना निवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे.

नियमांनुसार नोकरी सोडल्यावर पीएफमधून पैसे काढण्याची सुविधा आहे. पण, लोकांनी हे पैसे निवृत्तीसाठी वाचवावेत अशी ईपीएफओची इच्छा आहे. १ एप्रिल २०२४ ते ७ मार्च २०२५ पर्यंत EPFO ​​ला ७१ लाख PF सेटलमेंट दावे प्राप्त झाले. त्यापैकी ५० लाख दावे निकाली काढण्यात आले. यामध्ये ५५,१३३.५२ कोटी रुपये कर्मचाऱ्यांना देण्यात आले. गेल्या १० वर्षांत EPFO ​​सदस्यांच्या खात्यांची संख्या ११.७ कोटींवरून ३२.५ कोटी रुपये झाली आहे.

सेवानिवृत्ती बचतीच्या सवयीला प्रोत्साहन मिळेल
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेकवेळा लोक नोकरी बदलल्यावर पीएफचे संपूर्ण पैसे काढून घेतात. पीएफचे पैसे हे निवृत्तीसाठी खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ ​तरुणांमध्ये सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याच्या सवयीला चालना देण्यासाठी धोरणांवर विचार करत आहे. सध्या EPF मध्ये ठेवींवर ८.२५% व्याज दिले जात आहे. चक्रवाढ व्याजाच्या धोरणामुळे पीएफमध्ये जमा केलेले पैसे खूप वाढतात.

EPFO नियम काय सांगतात?
सध्याच्या ईपीएफ नियमांनुसार, सदस्य निवृत्तीनंतर पीएफची संपूर्ण रक्कम काढू शकतात. नोकरी गमावल्यास, एका महिन्यानंतर ७५% पैसे काढण्याची आणि दोन महिन्यांनंतर १००% पैसे काढण्याची परवानगी आहे. लोकांनी नोकरी गमावल्यास आर्थिक मदत होईल, असा नियमाचा उद्देश आहे, मात्र, बरेचदा लोक नोकरी सोडल्यानंतर २ महिने वाट पाहतात आणि नंतर त्यांचे संपूर्ण पैसे काढून घेतात.

Web Title: epfo concern how to curb pf withdrawals by young people how to secure retirement funds despite 8 25 interest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.