Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PF व्याजाची प्रतीक्षा संपणार! पीएफवर मिळणार ८.२५% व्याज; तुमच्या खात्यात किती पैसे येणार? पाहा हिशोब

PF व्याजाची प्रतीक्षा संपणार! पीएफवर मिळणार ८.२५% व्याज; तुमच्या खात्यात किती पैसे येणार? पाहा हिशोब

EPFO Interest : देशभरातील लक्षावधी वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी, त्यांचा पीएफ ही त्यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण बचतींपैकी एक असते. दरवर्षीप्रमाणेच, या वर्षीही लोकांना आपल्या पीएफ खात्यांमध्ये व्याज कधी जमा होईल आणि नेमकी किती रक्कम जमा होईल, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:53 IST2026-03-16T09:56:18+5:302026-03-16T10:53:14+5:30

EPFO Interest : देशभरातील लक्षावधी वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी, त्यांचा पीएफ ही त्यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण बचतींपैकी एक असते. दरवर्षीप्रमाणेच, या वर्षीही लोकांना आपल्या पीएफ खात्यांमध्ये व्याज कधी जमा होईल आणि नेमकी किती रक्कम जमा होईल, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

EPF Interest Rate 2025-26: When will 8.25% Interest be credited to EPFO Account? | PF व्याजाची प्रतीक्षा संपणार! पीएफवर मिळणार ८.२५% व्याज; तुमच्या खात्यात किती पैसे येणार? पाहा हिशोब

PF व्याजाची प्रतीक्षा संपणार! पीएफवर मिळणार ८.२५% व्याज; तुमच्या खात्यात किती पैसे येणार? पाहा हिशोब

EPFO Interest :नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी 'प्रोव्हिडंट फंड' हा त्यांच्या निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा आर्थिक आधार असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने वित्त वर्ष २०२५-२६ साठी ८.२५% व्याजदर जाहीर केला आहे. आता केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असून, त्यानंतर व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.

व्याज खात्यात कधी जमा होणार?
ईपीएफओच्या व्याजाची प्रक्रिया तीन टप्प्यांत चालते. पहिल्या टप्प्यात ट्रस्टी बोर्ड व्याजदर ठरवते, जो यंदा ८.२५% निश्चित झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता, सरकारची अंतिम मोहोर उमटल्यानंतर प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा व्हायला २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. साधारणपणे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत हे व्याज सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होईल.

व्याजाची गणना कशी केली जाते?

  • ईपीएफच्या नियमांनुसार, व्याजाची गणना 'मंथली रनिंग बॅलन्स' आधारावर केली जाते. याचे गणित समजून घेणे सोपे आहे.
  • मागील वर्षाच्या शिलकीवर पूर्ण व्याज : मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस तुमच्या खात्यात जी रक्कम होती, त्यावर पूर्ण १२ महिन्यांचे व्याज दिले जाते. मात्र, तुम्ही त्यातून पैसे काढले असतील तर ती रक्कम वजा केली जाते.
  • नवीन ठेवींवर व्याज : चालू वर्षात दरमहा तुमच्या पगारातून जो पीएफ कापला जातो, त्या नवीन रकमेवर ती जमा झाल्याच्या पुढच्या महिन्यापासून ३१ मार्चपर्यंतचे व्याज मोजले जाते.
  • पैसे काढल्यास काय होते? : जर तुम्ही वर्षाच्या मध्यात पीएफमधून काही रक्कम काढली, तर त्या रकमेवर केवळ पैसे काढलेल्या महिन्यापर्यंतच व्याज मिळते.
  • राउंड ऑफ : वर्षाच्या शेवटी एकूण व्याजाची रक्कम जवळच्या रुपयामध्ये राउंड ऑफ केली जाते.


सुरक्षित गुंतवणुकीचा 'महामार्ग'

बँकेतील मुदत ठेवी किंवा इतर बचत योजनांच्या तुलनेत ईपीएफवर मिळणारे व्याज अधिक आकर्षक मानले जाते. ८.२५% हा दर सध्याच्या महागाईच्या काळातही समाधानकारक असल्याने मध्यमवर्गीय नोकरदार लोकांसाठी ही दीर्घकालीन बचतीची सर्वात सुरक्षित संधी आहे.

वाचा - गुंतवणुकीचे टेन्शन सोडा! सेबीचे नवे 'लाईफ सायकल फंड्स' वयानुसार बदलणार तुमचा पोर्टफोलिओ

तुमचे व्याज जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा 'UMANG' ॲपद्वारे तुमचे पासबुक वेळोवेळी चेक करू शकता.
 

Web Title : PF ब्याज का इंतजार खत्म! 8.25% ब्याज; अपना खाता बैलेंस जांचें।

Web Summary : पीएफ खाताधारकों को जल्द ही 8.25% ब्याज मिलेगा। सरकार की मंजूरी का इंतजार है, जिसके बाद राशि चरणों में जमा की जाएगी, संभवतः जुलाई या अगस्त तक। ब्याज की गणना मासिक आधार पर की जाती है। ईपीएफओ एक सुरक्षित, उच्च उपज निवेश है।

Web Title : PF Interest Wait Ends! 8.25% Interest; Check Your Account Balance.

Web Summary : PF account holders will soon receive 8.25% interest. The government's approval is awaited, after which the amount will be credited in phases, likely by July or August. Interest is calculated on monthly running balances. EPFO is a secure, high-yield investment.